#MNS गांधी जयंतीनिमित्त वरळीत मनसेचं सफाई आंदोलन, रस्ता स्वच्छ होईल, लोकांची मनं कोण स्वच्छ करणार?
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची प्रतिकृती तयार करून ही प्रतिकृती मनसेनं खड्ड्यात ठेवली आणि त्यावर केक कापून मनसेनं हे उपहासात्मक आंदोलन केलं. कल्याण-डोंबिवली शहरांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून पावसामुळे खड्डे बुजवता येत नसल्याचे दावे महापालिकेकडून केले जात होते. मात्र गेल्या आठ दिवसांपासून पावसाने चांगलीच उघडीप घेतली असून तरीही महापालिकेला खड्डे बुजवण्यासाठी जाग आलेली नाहीये. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि वाहनचालक या खड्ड्यांसोबतच धुळीच्या त्रासाने वैतागले आहेत. याविरोधात मागणी करूनही केडीएमसी लक्ष देत नसल्याने मनसेनं थेट केडीएमसीची प्रतिकृती खड्ड्यांमध्ये ठेवत उपहासात्मक आंदोलन केलं.























