(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Zero Hour Sharad Pawar vs Ajit Pawar : बॅटल ऑफ बारामती... सामना विधानसभेचा!
Zero Hour Sharad Pawar vs Ajit Pawar : बॅटल ऑफ बारामती... सामना विधानसभेचा!
बारमतीत अवघ्या चार महिन्यात पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार असाच सामना रंगलाय..
आणि त्याच सामन्यात काय काय घडू शकतं.. याचाच एक ट्रेलर महाराष्ट्रानं पाहिलाय...
मंडळी, काल मोठं शक्तिप्रदर्शन करत अजित पवारांनी उमेदवारी अर्ज भरला... तर तितक्याच साध्या पद्धतीनं युगेंद्र पवारांनी अर्ज भरला... या काकापुतण्यांनी आपापल्या पद्धतीनं उमेदवारी अर्ज दाखल केला... आणि कन्हेरीच्या मारुती दर्शन घेवून दोघेही प्रचाराला लागले..
आणि पहिल्याच सभेत अजित पवारांनी काय काय वक्तव्यं केली... हे कदाचित तुमच्या लक्षात असेल.. तरीही पुन्हा एकदा सांगतो..
अजित पवारांनी पहिल्या भाषणात शरद पवारांपासून युगेंद्र पवारांपर्यंत सगळ्यांवर भाष्य केलं.. युगेंद्र पवारांच्या उमेदवारीच्या मुद्द्यावर त्यांनी आपल्या आईंचाही उल्लेख केला.. त्यावेळी अजित पवार काहीसे भावनिकही झाले..
बस्स..
हा तो क्षण होता.. जिथं शरद पवारांच्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली.. कालपासूनच अजित पवारांचे अवघ्या तीन महिन्यापूर्वीचे व्हीडिओ व्हायरल होऊ लागलेत.. लोकसभेच्या प्रचारात शरद पवारांकडून कसं भावनिक राजकारण करण्यात येईल.... शरद पवारांकडून तुम्हाला कसं भावनिक करण्यात येईल.. असा दावा अजित पवारांनी अनेक सभांमधून केला..
नेमके तेच व्हीडिओ कालपासून सोशल मीडियावर व्हायरल झाले.. इकडे आज दस्तुरखुद्द शरद पवारांनी अजितदादांना प्रत्येक आरोपावर उत्तर दिलं..
आणि कालच्याच नाही तर लोकसभेच्या त्यावेळी केलेल्या दाव्यांचंही उत्तर दिलं..
आज जे शरद पवार बारामतीकरांनी पाहिलेत.. ते कदाचित याआधी कधीच दिसले नसावेत..