एक्स्प्लोर

Zero Hour Vidhan Sabha 2024 : उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उरले 19 तास... मविआ-महायुतीच्या याद्या बाकी

Zero Hour Vidhan Sabha 2024 : उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उरले 19 तास... मविआ-महायुतीच्या याद्या बाकी
विधानसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारी अर्जाची डेडलाईन. मंडळी या क्षणापासूून बरोबर १९ तास उरलेत.. कशासाठी तर विधानसभा निवडणुकीसाठीचा  उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी. आता तुम्ही म्हणाल की हे तर निवडणूक आयोगानं आखून दिलेलं वेळापत्रकच आहे...  पण मंडळी तुमची उत्सुकता वाढायला एक रंजक गोष्ट आता सांगतो. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपायला अवघे १९ तास उरलेले असतानाही, महायुती असो किंवा महाविकास आघाडी... सहा प्रमुख पक्षांच्या या दोन आघाड्यांना राज्यातल्या २८८ मतदारसंघांमधील उमेदवार जाहीर करता आलेले नाहीत.. होय मंडळी... हे अवघे १९ तास उरलेले असताना दोन्ही आघाड्यांमध्ये काही जागांवरुन अजूनही चर्चा आणि संघर्षच सुरु आहे.. आज सकाळपर्यंत मविआच्या २५९ तर महायुतीच्या २४५ जागांवरचे उमेदवार जाहीर झाले होते... संध्याकाळी चार वाजता भाजपनं २५ जणांची तिसरी यादी जाहीर केली... इतकंच नाही तर अवघ्या काही मिनिटांपूर्वी भाजपनं लहान मित्रपक्षांसाठी ४ जागा जाहीर केल्यात.. त्याधरुन भाजपनं आतापर्यंत एकूण १५० जागांवर उमेदवार घोषित केलेत.. त्यामुळे महायुतीच्या उमेदावारांचा आकडा आता २६४ वर गेलाय. म्हणजे महायुतीसाठी आता फक्त २४ जागांवरचे उमेदवार घोषित करणं बाकी आहे. यात भाजपनं किती जागांवर उमेदवार जाहीर केलेत.. आणि मित्रपक्षांचे किती.. हे आपण आजच्या भागात पाहणार आहोत.. दरम्यान, दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षांची सात उमेदवारांची चौथी यादी आली.. त्यातलं एक नाव उमेदवार बदलासाठीचं होतं.. म्हणजेच सहा उमेदवारांची घोषणा झाली.. आणि महाविकास आघाडीचे २६५ उमेदवार जाहीर झाले.. ही सगळी आकडेमोड करणार आहोतच... पण, ती पाहत असतानाच.... आज झालेले मेगा नॉमिनेशन... आणि मविआतील संघर्ष... हेही पाहणं तितकंच गरजेचं आहे.. कारण, काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत अजूनही टस्सल सुरुच आहे. नाना पटोले आणि संजय राऊतांमधली शाब्दिक चकमक महाराष्ट्रानं आज पुन्हा अनुभवली. असं असलं तरी मविआकडूनही जाहीर झालेल्या उमेदवारांचा आकडा जवळपास  होतोय.. त्यामुळं पुढचे काही तास दोन्ही आघाड्यांसाठी महत्वाचे ठरणार आहेत.. आधीच विविध मतदारसंघांमधल्या उमेदवारीचं टेन्शन कायम असताना, छत्रपती संभाजीनगरातून आलेल्या एका बातमीनं उद्धव ठाकरेंची डोकेदुखी आणखी वाढलीय.. त्यावरही आजच्या भागात आपण सविस्तर चर्चा करणार आहोत.  सोबतच पाहणार आहोत... आज पार पडलेलं हायव्होल्टेज नॉमिनेशन्स. त्यातही अवघ्या महाराष्ट्राचं सर्वात जास्त लक्ष होतं ते बारामतीकडे..

महाराष्ट्र व्हिडीओ

Vinod Nikole on Shrinivas Vanga : श्रीनिवास वनगांना भेटायला आलो पण ते नॉट रिचेबल आहेत:विनोद निकोले
Vinod Nikole on Shrinivas Vanga : श्रीनिवास वनगांना भेटायला आलो पण ते नॉट रिचेबल आहेत:विनोद निकोले

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MNS Candidate List : मनसेचा धडाका सुरुच, 18 उमेदवारांची सातवी यादी जाहीर, इंदापूर, पारनेरमध्ये उमेदवार दिला
मनसेची सातवी यादी जाहीर, इंदापूर, पारनेर अन् नांदगावसह 18 उमेदवार जाहीर
Raj Thackeray Profile : व्यंगचित्रकार, शिवसेना ते मनसे; राज ठाकरे नावाच्या वादळाची कहाणी ABP MAJHA
Raj Thackeray Profile : व्यंगचित्रकार, शिवसेना ते मनसे; राज ठाकरे नावाच्या वादळाची कहाणी ABP MAJHA
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीमधील पेच अखेर सुटला; हातकणंगलेत जनसुराज्यकडून अशोकराव माने, शिरोळमध्ये यड्रावकरांना पाठिंबा
कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीमधील पेच अखेर सुटला; हातकणंगलेत जनसुराज्यकडून अशोकराव माने, शिरोळमध्ये यड्रावकरांना पाठिंबा
Ulhas Patil Shirol : कोल्हापुरात उद्धव ठाकरे गटाला तगडा झटका बसण्याची शक्यता; माजी आमदार उल्हास पाटील घरवापसीच्या तयारीत!
कोल्हापुरात उद्धव ठाकरे गटाला तगडा झटका बसण्याची शक्यता; माजी आमदार उल्हास पाटील घरवापसीच्या तयारीत!
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Vinod Nikole on Shrinivas Vanga : श्रीनिवास वनगांना भेटायला आलो पण ते नॉट रिचेबल आहेत:विनोद निकोलेKishanchand Tanwani : किशनचंद तनवाणींची माघार, कुणाचा घोडेबाजार? Special ReportRaj Thackeray Profile : व्यंगचित्रकार, शिवसेना ते मनसे; राज ठाकरे नावाच्या वादळाची कहाणी ABP MAJHASalil Deshmukh Katol : उशीर मिनीटभर, अर्ज उद्यावर; सलील देशमुख उद्या अर्ज भरणार Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MNS Candidate List : मनसेचा धडाका सुरुच, 18 उमेदवारांची सातवी यादी जाहीर, इंदापूर, पारनेरमध्ये उमेदवार दिला
मनसेची सातवी यादी जाहीर, इंदापूर, पारनेर अन् नांदगावसह 18 उमेदवार जाहीर
Raj Thackeray Profile : व्यंगचित्रकार, शिवसेना ते मनसे; राज ठाकरे नावाच्या वादळाची कहाणी ABP MAJHA
Raj Thackeray Profile : व्यंगचित्रकार, शिवसेना ते मनसे; राज ठाकरे नावाच्या वादळाची कहाणी ABP MAJHA
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीमधील पेच अखेर सुटला; हातकणंगलेत जनसुराज्यकडून अशोकराव माने, शिरोळमध्ये यड्रावकरांना पाठिंबा
कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीमधील पेच अखेर सुटला; हातकणंगलेत जनसुराज्यकडून अशोकराव माने, शिरोळमध्ये यड्रावकरांना पाठिंबा
Ulhas Patil Shirol : कोल्हापुरात उद्धव ठाकरे गटाला तगडा झटका बसण्याची शक्यता; माजी आमदार उल्हास पाटील घरवापसीच्या तयारीत!
कोल्हापुरात उद्धव ठाकरे गटाला तगडा झटका बसण्याची शक्यता; माजी आमदार उल्हास पाटील घरवापसीच्या तयारीत!
सिद्धी कदम, 26 वर्षीय यंग, स्कॉलर तरुणी शरद पवारांची उमेदवार; महिलांचे प्रश्न मांडणार, दिग्गजांशी भिडणार
सिद्धी कदम, 26 वर्षीय यंग, स्कॉलर तरुणी शरद पवारांची उमेदवार; महिलांचे प्रश्न मांडणार, दिग्गजांशी भिडणार
Madhurimaraje Chhatrapati : कोल्हापूर उत्तरमध्ये मधुरिमाराजेंच्या नावावर शिक्कामोर्तब; राजेश लाटकरांची उमेदवारी रद्द करण्याची 'नामुष्की'
कोल्हापूर उत्तरमध्ये मधुरिमाराजेंच्या नावावर शिक्कामोर्तब; राजेश लाटकरांची उमेदवारी रद्द करण्याची 'नामुष्की'
Shrinivas Vanga :  श्रीनिवास वनगांचे रडतानाचे व्हिडीओ पाहिले, उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना तातडीनं वनगांच्या घरी पाठवलं अन् ...
श्रीनिवास वनगांचे रडतानाचे व्हिडीओ पाहिले, उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना तातडीनं वनगांच्या घरी पाठवलं...
महादेव जानकर महायुतीतून बाहेर, तरीही भाजपनं रासपसह मित्रपक्षांना चार जागा सोडल्या, आठवले, राणा अन् कोरेंसाठी गुड न्यूज
महायुतीच्या जागावाटपात भाजपची मित्रपक्षांसह दीडशे जागांवर घौडदौड, आठवले, राणा अन् कोरेंना जागा सोडल्या
Embed widget