(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Zero Hour : बंडखोरांमुळे टेन्शन, कोल्हापुरात 'ड्रामा' काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज मागे
Zero Hour : बंडखोरांमुळे टेन्शन, कोल्हापुरात 'ड्रामा' काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज मागे
अर्ग मागे घेण्याची मुदत संपत असताना सर्वाधिक नाट्य घडलं कोल्हापुरात. कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीच्या अधिकृत होत्या मधुरिमाराजे छत्रपती. मात्र बंडखोर राजेश लाटकर यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली, आणि चक्क मधुरिमाराजे यांनी अर्ज मागे घेतला. हे सगळं घडत असताना नाट्यमय घडामोडी घडल्या. अर्ज मागे घेण्यासाठी छत्रपती कुटुंबीय पोहोचलेत हे कळल्यावर पश्चिम महाराष्ट्रातले काँग्रेसचे बडे नेते सतेज पाटील देखील घाईघाईनं पोहोचले. निवडणूक कार्य़ालयातील एका खोलीत शाहू महाराज, त्यांचे धाकटे पुत्र मालोजीराजे, सून मधुरिमाराजे आणि सतेज पाटील यांच्यात छोटेखानी बैठक झाली. मात्र चर्चा सुरू असतानाच मालोजीराजे यांनी हात धरून त्यांच्या पत्नीला खोलीबाहेर आणलं आणि निवडणूक कार्यालयात नेलं. यावर सतेज पाटील यांनी शाहू महाराजांसमोरच आपली नाराजी व्यक्त केली. तुम्ही मला तोंडघशी पाडलं, अशा शब्दांत पाटील यांनी आपला संताप व्यक्त केला. त्यानंतर छत्रपती कुटुंबीय घराकडे निघाल्यावर त्यांच्या समर्थकांना देखील सतेज पाटील यांनी सुनावलं. दम नव्हता तर अर्ज भरायचाच नव्हता, तुमच्यामुळे मी तोंडघशी पडलो असं म्हणत सतेज पाटीलही आपल्या कारमध्ये बसून निघून गेले.