Zero Hour : महाविकास आघाडी विधानसभा ठाकरेंच्या चेहऱ्यावर लढणार? सहमती नसताना नाव पुढे केलं जातंय?
Zero Hour : महाविकास आघाडी विधानसभा ठाकरेंच्या चेहऱ्यावर लढणार? सहमती नसताना नाव पुढे केलं जातंय?
हाविकास आघाडीचे सरकार असताना उद्धव ठाकरे यांनी केलेलं काम आणि त्यांचं नेतृत्व यामुळे त्यांच्याच हाती महाविकास आघाडीच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचार प्रमुखाचे काम देण्याचा विचार काँग्रेस पक्षाच्या हाय कमांडने केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मात्र मुख्यमंत्री पदाचा चेहऱ्याबाबत विचार हा विधानसभा निवडणुकीनंतर केला जाईल त्यामुळे फक्त प्रचार प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी नेतृत्व करावं, असा विचार काँग्रेसकडून समोर आला आहे तर यामध्ये महाविकास आघाडीच्या संयुक्त जाहीरनाम्याचे काम काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण करणार आहेत, पृथ्वीराज चव्हाण कडून लवकरच विधानसभा निवडणुकीसाठीच्या महाविकास आघाडीचा तयार करून जाहीर केला जाईल प्रचार प्रमुखासंदर्भात अधिकृत घोषणा महाविकास आघाडी कडून झालेली नाही, उद्या महाविकास आघाडीचा मुंबईत पहिला संयुक्त मेळावा होणार आहे... यामध्ये उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे प्रचार प्रमुख असणार का ? याबाबत महाविकास आघाडी कडून अधिकृत घोषणा केली जाणार का? हे पाहावे लागेल*
![ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 17 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/f50b4dd4432551bcdd60230fe713f9e21739814514058977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)