Zero Hour : लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक! ओम बिर्ला विरूद्ध इंडिया आघाडीने दिला उमेदवार
Zero Hour : लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक! ओम बिर्ला विरूद्ध इंडिया आघाडीने दिला उमेदवार
२०१४ साली म्हणजे सोळाव्या लोकसभेत आणि २०१९ साली म्हणजे सतराव्या लोकसभेत भाजप मजबूत स्थितीत होती, स्पष्ट बहुमत होतं, एनडीएकडे ३०० पेक्षा जास्त जागा होत्या. काँग्रेससारखा सर्वात जुना पक्ष आधी चव्वेचाळीस (44) आणि नंतर फक्त बावन्न (52) जागांवर अडकला होता. सर्वच विरोधी पक्ष विखुरलेले होते, मोदींच्या झंझावातापुढे गांगरुन गेले होते. त्याचा फायदा संसदेचंं कामकाज चालवताना भाजपला झाला नसता तरच नवल. २०१४ साली तांत्रिक मुद्द्यावर काँग्रेसला लोकसभेचं विरोधी पक्षनेतेपद सुद्धा मिळू दिलं नव्हतं. लोकसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या निवडीत सहसा प्रथा परंपरा पाळल्या जातात. सत्ताधारी पक्षाचा अध्यक्ष तर विरोधी पक्षाचा उपाध्यक्ष असतो हा अलिखित नियम आहे म्हणुयात. मात्र २०१४ साली भाजपच्या सुमित्राताई महाजन लोकसभा अध्यक्ष झाल्या तर तेव्हा भाजपचे मित्र पक्ष असलेल्या अण्णा द्रमुकचे थंबी दुराई उपाध्यक्ष बनले. २०१९ ला भाजपचे ओम बिर्ला लोकसभा अध्यक्ष बनले पण उपाध्यक्षपद पूर्ण पाच वर्ष रिक्तच ठेवण्यात आलं होतं. यावेळी परिस्थिती वेगळी आहे. भाजप बहुमतापासून दूर अडकली आहे...काँग्रेस शंभरवर पोहोचली आहे आणि सर्व विरोधी पक्ष इंडि आघाडीच्या रुपाने मजबुत उभा आहेत. त्यामुळे लोकसभ उपाध्यक्ष निवडीवरुन मोदी सरकारला संसदेत पहिला विरोध पाहायला मिळत आहे. भाजपचे ओम बिर्ला लोकसभा अध्यक्ष होणार हे नक्की आहे पण आजचा इंडि आघाडीचा रेजिस्टन्स ही एक झलक आहे, मोदी सरकारसमोरील वाट आधीच्या दोन टर्म एवढी सोपी नसेल. मोदी सरकार दोन पावलं मागे जात विरोधी पक्षांना उपाध्यक्ष पद देऊन प्रथा पाळेल की पहिल्याच दिवशी सुरु असलेला संघर्ष पुढे कायम ठेवेल