(Source: ECI/ABP News/ABP Majha)
WEB EXCLUSIVE : बेळगावात मराठी माणसांकडून मराठी माणूस पराभूत का झाला? ABP Majha
बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत मराठी माणसांनी महाराष्ट्र एकीकरण समितीचा दणदणीत पराभव केला आहे. मराठी पेक्षा हिंदुत्व मोठे ठरले. भाजपनं निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं आहे. भाजपने एकहाती सत्ता काबिज करत बेळगाव महापालिकेवर कमळ फुलवलं आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचा धुव्वा उडाला. दोन गटात आणि घराणेशाहिमुळे मतदारांचा एकीकरण समितीवर विश्वास उरलेला नाही. शिवाय तरूण मराठी पिढीला भाषिक एकतेचा मुद्दा किती भावतो हाही मुद्दा आहे. भाजपाने मोठ्या प्रमाणात मराठी उमेदवार दिले होते. या निवडणुकीत भाजपनं 35 काँग्रेसनं 10, अपक्ष 8, महाराष्ट्र एकीकरण समिती 4 आणि एम आय एम एक असे उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपाला जनतेने स्पष्ट बहुमताचा कौल दिला देत सत्ता सोपवली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीला या निवडणुकीत धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे 32 सदस्य आधीच्या सभागृहात होते. तर कन्नड उर्दू गटाचे 36 सदस्य होते.