Maharashtra Unlock : निर्बंध शिथिल करताना सरकारकडून गडबड? बार सुरू मग मंदिरं बंद का?
पंढरपूर : जेवढी गर्दी बारमध्ये होते, त्यापेक्षा कमी गर्दी मंदिरात होते. सोशल डिस्टन्स ठेवून मंदिरे उघडण्यास काय हरकत आहे, अशी सणसणीत टीका आज मंगळवारी देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर येथे एबीपी माझा सोबत बोलताना केली. आज माजी दिवंगत आमदार सुधाकर परिचारक यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमात ते आले होते.
आम्हा हिंदूंचे 33 कोटी देव आहेत, आम्हाला कुठेही देव भेटतो. मात्र, अनेक गरीब लोकांची उपजीविका मंदिरावर अवलंबून आहे. हारवाला ते पुजारी असंख्य गरीब लोकांची उपजीविका मंदिरावर अवलंबून आहे. त्यांच्यासाठी मंदिरं उघडा, मंदिरे बंद ठेवणे ही सरकरकची चूक आहे. तुम्ही दारूची दुकाने उघडी ठेवता. मात्र, मंदिरे बंद ठेवता म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधला.
महत्त्वाच्या बातम्या





















