एक्स्प्लोर

Crime News: पाय बांधले, गळा कापला अन् डोक्यात वार..., वाराणसीत प्रियकराच्या भाड्याच्या खोलीत सापडला प्रेयसीचा कुजलेला मृतदेह, पोस्‍टमॉर्टम रिपोर्टमध्ये चक्रावणारी माहिती समोर

Crime News: विद्यार्थिनीची गळा चिरून हत्या करण्यात आली असून तिच्या डोक्यावर एका जड वस्तूने जोरदार वार करण्यात आला होता. तसेच तिचे पायही बांधलेल्या अवस्थेत आढळून आले.

वाराणसी: वाराणसीमध्ये एमएससीचे (MSc) शिक्षण घेणाऱ्या आणि नीट (NEET) परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीच्या निर्घृण हत्या प्रकरणात शवविच्छेदन (पोस्टमार्टम) अहवालातून अत्यंत धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. अहवालानुसार, या विद्यार्थिनीची गळा चिरून हत्या करण्यात आली असून तिच्या डोक्यावर एका जड वस्तूने जोरदार वार करण्यात आला होता. तसेच तिचे पायही बांधलेल्या अवस्थेत आढळून आले.(Crime News)

Crime News:  शवविच्छेदन अहवालातील भयावह वास्तव

या हत्याकांडाच्या पोस्टमार्टमनंतर समोर आलेल्या अधिकृत अहवालात तिच्यावर झालेल्या अत्याचाराची भयानक सत्यता उघड झाली आहे. विद्यार्थिनीचा गळा चिरून आणि डोक्यावर गंभीर प्रहार करून तिची हत्या केल्याची पुष्टी झाली आहे. याशिवाय, तिच्यावर बलात्कार (दुष्कर्म) झाल्याची शंकाही अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. याच्या वैज्ञानिक आणि वैद्यकीय पुष्टीकरणासाठी डॉक्टरांच्या पथकाने फॉरेन्सिक तपासणीकरिता नमुने (सॅम्पल्स) प्रयोगशाळेत पाठवले आहेत. या महत्त्वाच्या खुलाशानंतर पोलिसांनी हत्या आणि संभाव्य लैंगिक शोषणाच्या कलमांन्वये तपास अधिक वेगवान केला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी विवेक चौबे याच्या अटकेसाठी ४ पथके तैनात करण्यात आली असून चुनार, नियारडीह आणि चोलापूरसह ८ ठिकाणांवर छापे मारले जात आहेत. तर दुसरीकडे, १० संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू आहे.(Crime News)

Crime News:  लग्न ठरल्याच्या रागातून आरोपीने रचला कट

मृत तरुणीच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे की, आरोपी विवेक चौबे हा तिला बऱ्याच काळापासून ब्लॅकमेल करत होता. त्याने तिचे लग्नाच्या कपड्यांमधील फोटो एडिट केले होते आणि जर तिने दुसरीकडे कुठं लग्न केले, तर हे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली होती. दरम्यान, कुटुंबीयांनी विद्यार्थिनीचे लग्न दुसऱ्या ठिकाणी निश्चित केले होते आणि २२ फेब्रुवारी रोजी तिचे लग्न होणार होते. यामुळे संतप्त झालेल्या आरोपीने १८ ऑगस्ट रोजी तिला 'नीट'च्या तयारीसाठी मदत करण्याचे आश्वासन देऊन आपल्या भाड्याच्या खोलीवर बोलावले आणि तिची अमानुषपणे हत्या केली.(Crime News)

कुटुंबीयांना काही अघटित घडल्याची शंका आल्यानंतर पोलिसांनी सर्व्हिलन्सच्या (Surveillance) मदतीने बच्छाव येथील भाड्याच्या खोलीवर धाड टाकली. दरवाजा उघडला असता, तरुणीचा मृतदेह बाथरूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. तिचा गळा कापलेला होता आणि पाय बांधलेले होते. ज्या घरात ही धक्कादायक घटना घडली, त्या घराच्या मुख्य दरवाजावरील सीसीसीटीव्ही (CCTV) कॅमेरा बंद आढळला आहे. पुरावे नष्ट करण्यासाठी किंवा ओळख लपवण्यासाठीच कॅमेरा बंद करण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे. सखोल तपासासाठी पोलिसांनी तरुणीचा मोबाईल आणि लॅपटॉप ताब्यात घेतला आहे. 

Crime News: राजकीय महत्त्वाकांक्षा आणि कौटुंबिक विवादही समोर

तपासादरम्यान समोर आले आहे की, आरोपी विवेक चौबे गेल्या ३ वर्षांपासून आपल्या मामाच्या घरी राहत होता. तो आपल्या मूळ गावी नियारडीह येथे ग्रामपंचायत (ग्रामप्रधान) निवडणूक लढवण्याच्या तयारीत होता. यावरून त्याचा स्वतःच्या काकांशी (अनिल चौबे) कौटुंबिक वाद आणि वैर सुरू होते. या संपूर्ण घटनेवर बोलताना एडीसीपी (ADCP) गोमती नीतू काद्यान यांनी सांगितले की, पोस्टमार्टम, फॉरेन्सिक अहवाल आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे केस अधिक मजबूत केली जात आहे. फरार आरोपीला लवकरात लवकर अटक करून त्याला कठोर शिक्षा दिली जाईल.

Crime News: बाथरूममध्ये कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

 तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या या विद्यार्थिनीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह तिच्या प्रियकराच्या भाड्याच्या खोलीत आढळून आला. या घटनेनंतर समोर आलेल्या शवविच्छेदन (पोस्टमार्टम) अहवालाने तपासाला अत्यंत धक्कादायक वळण दिले आहे. १८ ऑगस्ट रोजी ही विद्यार्थिनी कॉलेजला जाते असे सांगून घरातून बाहेर पडली होती, मात्र ती परतलीच नाही. कुटुंबीयांनी शोध घेऊनही पत्ता न लागल्याने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी तिच्या मोबाईल क्रमांकावरून सर्व्हेलन्स सुरू केले असता, तिचे शेवटचे लोकेशन वाराणसीतील बच्छाव येथील मालवीय इंटर कॉलेजजवळ सापडले. शोध घेतानाच तरुणीची आई आणि चुलत भावाला माहिती मिळाली की, त्यांच्या ओळखीतील व नातेसंबंधातील विवेक चौबे (रा. चोलापूर) हा तरुणही बेपत्ता आहे. विवेकने बच्छाव परिसरात भाड्याने खोली घेतली होती. त्याच्या मिर्झापूरमधील सीखर गावात राहणाऱ्या मामाच्या घरी एका बॅगेत या खोलीची चावी सापडली. तरुणीची आई ती चावी घेऊन बच्छाव येथील भाड्याच्या खोलीवर पोहोचली. खोलीचे कुलूप उघडून आत प्रवेश करताच तीव्र दुर्गंधी आली. आत शोध घेतला असता, बाथरूममध्ये विद्यार्थिनीचा कुजलेला मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला.

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Baramati  : मुंबईत टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, तर बारामतीत एका उद्योजकावर हल्ला, धक्कादायक घटनांनी महाराष्ट्र हादरला
Baramati  : मुंबईत टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, तर बारामतीत एका उद्योजकावर हल्ला, धक्कादायक घटनांनी महाराष्ट्र हादरला
Tiger Shroff :  टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण! जशास तसे उत्तर देऊ, हे करणाऱ्यांना ठेचून काढू : एकनाथ शिंदे
Tiger Shroff : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण! जशास तसे उत्तर देऊ, हे करणाऱ्यांना ठेचून काढू : एकनाथ शिंदे
Tiger Shroff :  टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण! एका व्यक्तीला घेतलं ताब्यात, जुहू पोलिसांची मोठी कारवाई
Tiger Shroff :  टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण! एका व्यक्तीला घेतलं ताब्यात, जुहू पोलिसांची मोठी कारवाई
Tiger Shroff : टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पोलिस आयुक्तांना फोन, दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश  
Tiger Shroff : टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पोलिस आयुक्तांना फोन, चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश  
Advertisement

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tiger Shroff: दैव बलवत्तर म्हणून अवघ्या काही सेकंदात टायगर श्राॅफ बचावला, घटनास्थळावरील थरकाप उडवणारे 12 फोटो
दैव बलवत्तर म्हणून अवघ्या काही सेकंदात टायगर श्राॅफ बचावला, घटनास्थळावरील थरकाप उडवणारे 12 फोटो
Tiger Shroff Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगरचा जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगर श्रॉफचा अवघ्या काही सेकंदात जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
Tiger Shroff: बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
Tiger Shroff: टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका, सर्वाधिक फायदा 'या' कंपनीला
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
Embed widget