एक्स्प्लोर
VP Jagdeep Dhankhar Resigns | आजारपण की राजकारण? दिल्लीत मोठी उलथापालथ!
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आजारपणाचे कारण देत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. धनखड यांच्या राजीनाम्यामागे नेमके कारण काय, असा प्रश्न गल्लीपासून दिल्लीपर्यंत विचारला जात आहे. काँग्रेसने या राजीनाम्यावर सवाल उपस्थित केले आहेत. भाजपाच्या वरिष्ठ पातळीवर जोरदार राजकारण सुरू असल्याची चर्चा आहे. धनखड यांच्या राजीनाम्यानंतर अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वासरी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी धनखड राज्यसभेत सभापती स्थानी उपस्थित होते. त्यांनी न्यायमूर्ती वर्मा यांच्यावरील विरोधकांचा महाभियोग प्रस्ताव स्वीकारल्याचे जाहीर केले. काल दिवसभर पंतप्रधानही संसद भवन परिसरात उपस्थित होते. संध्याकाळी पंतप्रधानांसह वरिष्ठ मंत्र्यांची एक बैठक पार पडली. या बैठका न्यायमूर्ती वर्मांच्या महाभियोग प्रस्तावाबाबत असल्याची चर्चा झाली, मात्र त्या धनखड यांच्या संदर्भात होत्या का, असा सवालही उपस्थित केला गेला. एका खासदाराने प्रतिक्रिया दिली की, "देश के सबसे महत्वपूर्ण दूसरे संवैधानिक पद पर बैठने वाले व्यक्तिने फैसला क्यों लिया।" बिहारमधील राजदचे आमदार मुकेश रोशन यांनी नितीश कुमार यांना उपराष्ट्रपती करण्यासाठी धनखड यांचा राजीनामा घेतला, असा दावा केला. मात्र, जेडीयूचे मंत्री मदन सैनी यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. दिल्लीत मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महाराष्ट्र
Coffee With Kaushik : Nilesh Rane, Yogesh Kadam, शिंदेंची यंग ब्रिगेड EXCLUSIVE
Ambadas Danve On MIM : इम्तियाज जलील भाजपचा हस्तक, त्याने शहराला व्यसन लावलं
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
आणखी पाहा























