एक्स्प्लोर
Online Engagement: लंडनचा नवरा, वैजापूरची नवरी, Video Call वर पार पडला अनोखा साखरपुडा!
छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये एक अनोखा साखरपुडा सोहळा पार पडला, जिथे नवरी मुलगी वैजापूरमध्ये तर नवरदेव लंडनमध्ये होता. वेळ आणि अंतराच्या मर्यादांवर मात करत, दोन्ही कुटुंबांनी व्हिडिओ कॉलद्वारे हा साखरपुडा संपन्न केला. मुलगा लंडनमध्ये एका प्रतिष्ठित कंपनीत कार्यरत असल्याने त्याला भारतात येणे शक्य नव्हते, त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत हा निर्णय घेण्यात आला. वैजापूर येथे मुलीच्या घरी पारंपरिक विधी पार पडले, तर लंडनमधून तरुणाने व्हिडिओ कॉलवर उपस्थिती लावत होकार दिला. नातेवाईकांनी टाळ्यांच्या गजरात या ऑनलाइन सोहळ्याला शुभेच्छा दिल्या, आणि हा डिजिटल साखरपुडा सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
नाशिक
क्रिकेट
Advertisement
Advertisement

















