मराठवाड्यातील Maratha जणगणनेत कुणबी मराठा, मराठा समाजाला OBC प्रवर्गातून आरक्षण द्या : Vinayak Mete
राज्य मागासवर्गीय आयोगामध्ये बहुतांश लोक मराठा समाजाच्या विरोधात काम करणारे आहेत. मुळात आयोगावरील लोकांना सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होता येत नाही मात्र लोणावळा येथे आयोजित एका ओबीसी समाजाच्या बैठकीला ही मंडळी गेली होती. आणि त्यांनी भाषणं देखील केली होती. आम्ही आज राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव पास केला कारण त्यांनी त्यांच्या संस्थेत 1 वर्षे मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे शुल्क माफ केलं आहे, असं विनायक मेटे यांनी म्हटलं.
आम्ही 2 सप्टेंबरला संपूर्ण राज्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहोत. 7 किंवा 8 सप्टेंबरला एक राज्यव्यापी बैठक घेणार आहोत. त्यानंतर आम्ही गणपती विसर्जनानंतर आझाद मैदानाला उपोषणाला बसणार आहोत. आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही. त्यानंतर आम्ही मुंबईत महामोर्चा काढणार आहोत. उद्या आम्ही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची सकाळी 10 वाजता भेट घेणार आहोत. या भेटीवेळी आम्ही राज्य सरकार जाणिवपूर्वक आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे याबाबत बोलणार असल्याचं मेटे यांनी सांगितलं. सरकारला त्यांनी मराठा आरक्षण प्रश्नी जाब विचारावा आणि ओबीसी आयोग बरखास्त करावा अशी देखील मागणी करणार असल्याचं विनायक मेटे यांनी सांगितलं.