Vijay Doiphode Accident : मुरलीधर मोहोळ यांनी केली विजय डोईफोडेंच्या तब्येतीची विचारपूस
Vijay Doiphode Accident : मुरलीधर मोहोळ यांनी केली विजय डोईफोडेंच्या तब्येतीची विचारपूस
पुण्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 22 वर्षांच्या एका पैलवानाचा अपघात झाला सध्या तो मृत्युशी झुंज देत आहे. कोल्हापूरात कुस्तीचे प्रशिक्षण घेणाऱ्या 22 वर्षांच्या पैलवान विजय डोईफोडेने (Vijay Doiphode) आतापर्यंत राष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये महाराष्ट्रासाठी पदकांची कमाई केली असून महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सलग तीन वर्षे तो सुवर्णपदकाचा मानकरी ठरला आहे. तो गेल्या आठवड्यात दुखापतीवर उपचार करून घेण्यासाठी पुण्यात आलेला होता. त्यावेळी विजयचा पुण्यातील स्वारगेट भागात दुचाकी खड्ड्यात आपटून अपघात झाला.
या अपघातामध्ये विजयच्या डोक्याला जोरदार मार लागला असून तो अपघात झाला तेव्हापासून बेशुद्ध आहे. त्याच्यावर सध्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या उपचारांसाठी लाखों रुपयांची गरज असून त्याच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने त्याच्यावर चांगले उपचार व्हावेत यासाठी आर्थिक मदतीचे आवाहन त्याच्या पैलवान मित्रांकडून करण्यात आलं आहे.
त्याच्या तब्येतीबद्दल एबीपी माझाला माहिती देताना विजयची बहिण म्हणाली, अद्याप तो शुध्दीवरती आलेला नाही. त्यावरती शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. शस्त्रक्रिया केल्यानंतर 72 तास झाले असून तो अद्याप शुध्दीवर आलेला नाही. पुण्यात आल्यानंतर त्याचा अपघात झाला, तेव्हापासून तो बेशुध्द अवस्थेत आहे.