एक्स्प्लोर
Vidhan Bhavan Brawl विधान भवन हाणामारीनंतर सुरक्षा व्यवस्थेत बदल, मोजक्यांनाच प्रवेश Special Report
नुकत्याच संपलेल्या पावसाळी अधिवेशनात विधान भवन परिसरात झालेल्या हाणामारीनंतर सुरक्षा व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. अधिवेशन काळात विधान भवन परिसर कार्यकर्त्यांसाठी टूरिस्ट स्पॉट बनल्याचे चित्र होते. या गर्दीमुळेच हाणामारीची घटना घडली. या घटनेनंतर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून, प्रत्येक पासची तपासणी करूनच प्रवेश दिला जात आहे. आमदार भास्कर जाधव यांनी विधान भवनातील गर्दीवर चिंता व्यक्त केली. रेल्वेत नसते तेवढी गर्दी अधिवेशनात असते, असा टोला त्यांनी लगावला. पैसे देऊन पास विकत मिळतात, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील यांनी पासेसवर निर्बंध घालण्याची मागणी केली. आमदार अनिल परवाने यांनी आयनोक्स थिएटरजवळ पास विकले जात असल्याचा आरोप करत प्रतिज्ञापत्रावर नावे देण्याची तयारी दर्शवली. यावर शंभूराज देसाई यांनी चौकशीची ग्वाही दिली. विधीमंडळाच्या मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांनी घटनेचा अहवाल विधानसभा अध्यक्षांकडे सादर केला आहे. हाणामारी करणाऱ्यांच्या वर्तणुकीची जबाबदारी संबंधित आमदारांची होती, असे अहवालात नमूद आहे. नीती मूल्य समिती गठित करण्याचा विचारही बोलून दाखवण्यात आला. 'भविष्यामध्ये जरी ह्याला आळा बसला नाही, तर फार भयानक होईल,' अशी चिंता व्यक्त करण्यात आली आहे. अनधिकृत प्रवेशिका नसतानाही अभ्यागत सदस्यांसोबत विधान भवनात आले आणि त्यांनी आक्षेपार्ह कृत्य केले, असे दिसून येत आहे. लोकप्रतिनिधींनी आपल्या जबाबदारीचे भान ठेवणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र
Delhi Blast Update: दिल्लीत स्फोटकं बनवण्यासाठी पिठाच्या चक्कीचा वापर, सूत्रांची माहिती
Ameet Satam On Thackeray : ठाकरे बंधूंना समज येण्यासाठी आम्ही प्रार्थना करणार- साटम
Ambernath Shivsena Leader Accident : अंबरनाथमध्ये शिवसेना नेत्याचा कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू
Leopard News : नियम बदलणार, दहशत संपणार? चांदा ते बांदा बिबट्यांचा धुमाकूळ सुरूच Special Report
Malgaon Protest : जनआक्रोश मोर्चात गोंधळ, मोर्चेकरांचा गेट तोडून न्यायालयात शिरण्याचा प्रयत्न
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
मुंबई
क्रीडा
सोलापूर
Advertisement
Advertisement






















