Vegetable Price Hike : परतीच्या पावसाचा तडाखा, भाज्यांचे दर आवाक्याबाहेर; 25 ते 30 टक्क्यांनी वाढ
परतीच्या पावसामुळे काढणीला आलेल्या भाजीपाल्याचं प्रचंड नुकसान झालंय.. त्यामुळे नाशिक, पुणे, मुंबई, ठाणे तसंच उपनगरांत भाज्यांच्या दरात 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झालीये. राज्यातील पुणे, नाशिक जिल्ह्यांसह इतर जिल्ह्यांत झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. मुंबई-ठाणे आणि पुण्यात भेंडी, गवार, शिमला मिरची, फ्लॉवर, कोबी, वांगी, फरसबी अशा सर्वच भाज्यांचे दर कडाडले आहेत. सध्या बाजारात उत्तम दर्जाच्या भाज्या केवळ 25 टक्केच येत असल्याची माहिती समोर आली आहे. वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज 400 ते 450 भाज्यांच्या गाडय़ा दाखल होत आहेत, अशी माहिती वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीकडून देण्यात आली.





















