Vande Bharat Express Test Drone View : वंदे भारत एक्सप्रेसच्या चाचणीचे दृष्य कॅमेऱ्यात कैद ABP Majha
Vande Bharat Express Test Drone View : वंदे भारत एक्सप्रेसच्या चाचणीचे दृष्य कॅमेऱ्यात कैद ABP Majha
10 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दोन वंदे भारत एक्सप्रेस ला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. मात्र त्याआधी या बंदे भारत एक्सप्रेस ला मोठ्या कसोटीतून स्वतःला सिद्ध करावे लागणार आहे. ही कसोटी म्हणजे पश्चिम घाट. दोन्ही वंदे भारत एक्सप्रेसच्या मार्गात भारतातील सर्वात कठीण असे दोन घाट लागतात. त्यात या गाडीला बँकर इंजिन लावण्यात येणार नाहीत त्यामुळे सध्या या घाटांमध्ये गाडीच्या चाचण्या सुरू आहेत. जर त्या चाचण्या यशस्वी झाल्या तरच या मार्गांवर मध्ये भारत एक्सप्रेस सुरू करता येईल. आज देखील अशाच प्रकारची एक चाचणी घेण्यात येणार आहे त्यासाठी सीएसएमटी ते इगतपुरी आणि सीएसएमटी ते लोणावळा अशाप्रकारे बंद भारत एक्सप्रेस चालवून त्यातील ब्रेकिंग सिस्टीम तपासले जाणार आहे.