Ujjwal Nikam on Thackeray vs Shinde: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल कधी ?
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल काधी लागणार?..संपूर्ण महाराष्ट्राला सध्या हा प्रश्न पडलेला आहे.. हा निकाल लवकरच लागण्याची शक्यता आहे.. सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालासाठी आता केवळ चार ते पाच तारखाच उरल्यात.. 8 मे ते 12 मे याच काळात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे... राज्याच्या सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे झाली होती. त्यातील न्यायमूर्ती एम. आर. शाह हे 15 मे रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे 14 मेच्या आधी हा निकाल लागण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा फैसला काय येणार? याची उत्सुकता फक्त राज्यालाच नाही तर देशाला लागली आहे.























