एक्स्प्लोर
Voter List Row: 'मतदार याद्यांमधल्या घोळावर' Uddhav Thackeray यांचा 'Action Mode', Raj Thackeray नंतर आता उद्धवजींचा मेळावा
मतदार याद्यांमधील (Voter Lists) घोळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आक्रमक झाले आहेत. उद्धव ठाकरे येत्या २५ ऑक्टोबर रोजी मुंबईत पक्षाच्या उपशाखा प्रमुखांचा एक मोठा मेळावा घेणार आहेत. 'मतदार यादी कशी तपासावी, त्यातील घोळ कसा काढायचा आणि तो कोणाकडे द्यायचा' याबाबत स्वतः उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार असल्याचे समजते. राज ठाकरे यांनी नुकताच आपल्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनीही सुमारे तीन हजार उपशाखा प्रमुखांना एकत्र बोलावले आहे. शाखाप्रमुख आणि उपशाखाप्रमुख हे थेट ग्राउंड लेव्हलला काम करत असल्याने, त्यांना मतदार याद्या तपासण्याचे आणि त्यातील त्रुटी शोधून काढण्याचे प्रशिक्षण या मेळाव्यात दिले जाणार आहे. यापूर्वी महाविकास आघाडी आणि मनसेच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन याद्यांमधील त्रुटींबाबत तक्रार केली होती.
महाराष्ट्र
Nagpur Leopard Rescue Operation | बिबट्याला डार्ट बसला,अर्ध बेशुद्ध अवस्थेत 15 फूट उंचीवर उडी मारली
Baba Adhav Funeral : समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Nilesh Rane on Konkan Road : कंत्राटदार, अधिकाऱ्यांचा बंदोबस्त करा, कोकणाचे रस्ते नीट करा
Ambadas Danve PC : आमदाराचा नोटांची जाडजुड बंडलं मोजतानाचा VIDEO; अंबादास दानवेंनी सगळच काढलं
Ambadas Danve vs Mahendra Dalvi : अंबादास दानवेंचा 'कॅश बॉम्ब'; काय आहे संपूर्ण प्रकरण?
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























