(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Uddhav Thackeray on Budget:महायुती सरकारचा बजेट म्हणजे यांचे कंत्राटदार मित्र जोमात आणि शेतकरी कोमात
Uddhav Thackeray on Budget, Mumbai : अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या 2024-25 वर्षाच्या अंतरिम अर्थसंकल्प आज (दि.27) विधानसभेत सादर केला. अर्थसंकल्पात एकूण खर्चासाठी 6 लाख 522 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बजेटवर प्रतिक्रिया दिली आहे. महायुती सरकारचा बजेट म्हणजे यांचे कंत्राटदार मित्र जोमात आणि शेतकरी कोमात असा असल्याचे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले आहेत. विधीमंडळाच्या बाहेर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. उद्धव ठाकरे म्हणाले, जयंत पाटील अर्थमंत्री होते त्यामुळे माझ्या पेक्षा जास्त त्यांना माहीत आहे. आजचा अंतरिम अर्थसंकल्प पाहिला तर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा बजेट मांडला आहे. अवकाळी पावसाचा राज्याला फटका बसला आता या घोषणाचा फटका बसेल की काय अशी अवस्था आहे. मुंबईत रस्ते घोटाळा आहे, टेंडर वर टेंडर लोक काढत आहेत.