(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Uday Samant : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सांगली विमानतळाची जागा विकली, सामंताचा गौप्यस्फोट
Uday Samant : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सांगली विमानतळाची जागा विकली, सामंताचा गौप्यस्फोट उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सांगलीच्या त्या विमानतळाची जागा तत्कालीन उद्योग मंत्र्यांनी विकली .... उद्योगमंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट..मविआ सरकारच्या काळात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे असताना तत्कालीन उद्योग मंत्र्यांनी सांगलीतील विमानतळाची जागा गुजरातच्या व्यापाऱ्याला विकल्याचा गौप्यस्फोट उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे .सांगलीमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्यामध्ये बोलत होते. नुकत्याच शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मिरज मधील जनसंवाद मेळाव्यात सांगलीचे विमानतळ का होऊ शकले नाही,असा प्रश्न उपस्थित केला होता. यावरून उद्योग मंत्री उदय सामंतांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंना विमानतळ का करता आले नाही, असा प्रश्न उपस्थित करत तत्कालीन उद्योग मंत्र्यांकडून 66 एकर विमानतळाची सांगलीची जागा गुजरातच्या एका व्यापाऱ्याला विकण्यात आला होती,पण आपण उद्योग मंत्री झाल्यावर तो व्यवहार रद्द केल्याचा गौप्यस्फोटमंत्री सामंत यांनी केला.तसेच सांगलीत आलेल्या उद्धव ठाकरे यांनी वसंतदादा पाटील यांच्या स्मारकाला जाणं पसंत केलं मात्र सांगलीतल्या बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाला भेट देऊ शकले नाहीत,त्यामुळे ते किती काँग्रेस मय झाले आहेत यावरून स्पष्ट होतं,अशी टीका देखील सामंतांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.