Uddhav Thackeray on Maharashtra Assembly:विधानसभेसाठी ठाकरेंनी कंबर कसली,पुणे जिल्ह्याचा आढावा घेणार
लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेच्या तयारीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतींच्या बैठका सुरू झाल्या आहेत... महायुतीतील भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट लोकसभा निवडणुकीला जागा वाटपात झालेला गोंधळ लक्षात ठेवून तिन्ही पक्ष विधानसभेला चांगले यश कसे मिळेल या दृष्टिकोनातून अधिकाधिक जागा मिळवण्याच्या तयारीत आहे... राज्यात लोकसभेत मिळालेले यश विधानसभेत सुद्धा मेळावा आणि चांगला समन्वय राहावा यासाठी महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आपल्या ताकद असलेल्या जागांचा अभ्यास करून त्या जागांची तयारी करतय... जागा वाटपावर अद्याप कुठलाच निर्णय झालेला नसताना जागांची तयारी आणि जागांचे दावे हे प्रत्येक पक्षाकडून केले जात असल्याचा पाहायला मिळतय...
ठाकरेंची शिवसेना मुंबईतील ३६ पैकी किमान २५ जागा लढवण्याच्या तयारीत आहे.. मुंबईतील बहुतांश मतदारसंघावर ठाकरेंची शिवसेना आग्रही आहे.. वांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाई तर दहिसरमधून तेजस्वी घोसाळकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.. महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जागांमध्ये अदलाबदल होण्याची शक्यता आहे.. २०१९मध्ये शिवसेनेला ३६ पैकी १४ जागा मिळाल्या होत्या.. त्यातील ८ आमदार सध्या ठाकरेंसोबत आहेत..