(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Uddhav Thackeray Camp : निवडणुक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गट आज याचिका दाखल करण्याची शक्यता
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय... या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाने आता निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे... उद्धव ठाकरे गटाकडून आजच सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाण्याची शक्यता आहे... धनुष्यबाण कायमस्वरूपी शिंदे यांना देण्याचा निर्णय चुकीचा असल्याचा दावा याचिकेत केला जाणार आहे सोबतच पक्षांतर बंदी कायद्यासंदर्भातले मुद्दे कोर्टाच्या याचिकेत प्रलंबित असताना पक्ष म्हणून त्यांनाच मान्यता दिली जाण्याचा निर्णय हा देखील चुकीचा असल्याचा दावा याचिकेत केला जाणार आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत घटनापीठाने उद्यापासून सलग तीन दिवस सुनावणीसाठी राखीव ठेवले आहेत त्यामुळे आज दाखल केल्या जाणाऱ्या याचिकेवर उद्याच युक्तिवाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाकरे गटाची ही याचिका आता सुप्रीम कोर्ट ऐकणार की हायकोर्टात दाद मागायला सांगणार हे पाहावं लागेल