एक्स्प्लोर
Toll Protest: 'दहिसर टोलनाका नकोच', Versova मध्ये स्थानिकांचा उद्रेक, Sarnaik यांची गाडी अडवली
मुंबईतील वर्सोवा (Versova) परिसरात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या गाडीला स्थानिकांनी घेराव घातला आहे. ‘दहिसर टोलनाका (Dahisar Toll Naka) वर्सोवा परिसरात नको’, याच मागणीसाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची गाडी अडवण्यात आली आहे. दहिसर येथील टोलनाका वर्सोवा पुलाजवळ हलवण्याच्या प्रस्तावाला स्थानिकांचा तीव्र विरोध आहे, आणि तोच दर्शवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. या घटनेनंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. टोलनाक्यामुळे विशेषतः सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी (Peak Hours) परिसरात मोठी वाहतूक कोंडी होऊ शकते, अशी भीती नागरिकांना वाटत आहे. याच कारणास्तव हा विरोध अधिक तीव्र झाला असून, स्थानिकांनी थेट परिवहन मंत्र्यांची गाडी अडवून आपल्या मागण्या मांडण्याचा प्रयत्न केला. सध्या या प्रस्तावाला NHAI ने नकार दिला असला तरी, स्थानिकांमधील असंतोष कायम आहे.
महाराष्ट्र
Amruta Fadnavis : Uddhav Thackeray सोडून जातील अमृतांनी फडणवीसांजवळ व्यक्त केली होती शंका
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
Khasbag Kusti Maidan Kolhapur:50 लि. दूध,10पोती लिंबू,10 पोती हळद,10 डबे तेल,खासबाग मैदानाचा खुराक
Nagar Panchayat Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion





















