Top 80 News | 8 AM | टॉप 80 बातम्यांचा वेगवान आढावा | 16 April 2025 | ABP Majha
Top 80 News | 8 AM | टॉप 80 बातम्यांचा वेगवान आढावा | 16 April 2025 | ABP Majha
एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंची शिवतीर्थावर दीड तास भेट, स्नेहभोजनासह बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा दिल्याची शिंदेंची प्रतिक्रिया. सदिच्छा भेट असल्याची शिंदेंची माहिती.
ठाकरेंच्या शिवसेनेचा आज नाशिकमध्ये निर्धार मेळावा, एआयच्या माध्यमातून बाळासाहेबांच्या आवाजात भाषण तर विविध विषयांवर सखोल चिंतन आणि चर्चा
हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा आज नागपूरमध्ये 'सद्भावना शांती यात्रा', राज्यात शांतता नांदण्यासाठी शांती यात्रेचं आयोजन
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणातील आरोपपत्राविरोधात काँग्रेसची आज देशभरातील ईडी कार्यालयांबाहेर निदर्शने..चार्जशीटमध्ये सोनिया गांधी आरोपी क्रमांक एक तर राहुल आरोपी क्रमांक दोन
काँग्रेस खासदार प्रियंका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रांची आजही ईडी चौकशी करणार, हरियाणातील शिकोहपूर जमीन घोटाळ्याप्रकरणी काल ६ तास कसून चौकशी
नाशिकच्या काठे गल्ली परिसरातील अनधिकृत सातपीर दर्गा हटवला, मध्यरात्री कारवाईदरम्यान दगडफेक, सकाळपासून पोलीस बंदोबस्तात वाढ
महत्त्वाच्या बातम्या























