Top 80 at 8AM Superfast 21 December 2024 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्या
Top 80 at 8AM Superfast 21 December 2024 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्या
अधिवेशन संपल्यानंतर खातेवाटप होण्याची शक्यता,नाराजीनाट्य उफाळून येऊ नये यासाठी महायुतीचा सावध पवित्रा, २३ तारखेला मंत्री संभाव्य खात्यांचा घेऊ शकतात चार्ज, सूत्रांची माहिती.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस, आज अंतिम आठवडा प्रस्तावर चर्चा होणार, आज देखील विरोधक विधिमंडळ परिसराबाहेर आंदोलन करण्याची शक्यता
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात गुरुवारी ३५ हजार ७८८ कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून सर्व आमदारांच्या मागण्यांची दखल घेतली जाण्याचं आश्वासन.
अधिवेशनानंतर विरोधी पक्षांसह मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याची पत्रकार परिषद होणार, आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस.
शरद पवार आज बीड, परभणी दौऱ्यावर, बीडमधील देशमुख कुटुंबीयांची सांत्वन पर भेट घेणार. तर परभणीत सूर्यवंशी यांच्या कुटुंबासह धरणे आंदोलनस्थळी सुद्धा शरद पवार भेट देणार
बीडमधील हत्येचं समर्थन कोणीच करत नाही, तपास सुरू आहे, दुध का दुध पानी का पानी होईल, धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया.
संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी केलेल्या कारवाईवर त्यांच्या कुटुंबीयांकडून नाराजी व्यक्त, बीडच्या एसपींना नोकरीतून बडतर्फ करा, देशमुख कुटुंबीयांची मागणी.
परभणी घटनेच्या निषेधार्थ आज जालना जिल्हा बंदची हाक. कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व व्यवहार बंद राहणार.शेतकऱ्यांनी आज शेतीमाल विक्रीला न आणण्याचं समितीच्या सचिवांचं आवाहन
संजय राऊत यांच्या घराची रेकी करणारे खासगी कंपनीचे कर्मचारी असल्याची पोलिसांची माहिती. मोबाईल नेटवर्कच्या तपासणीसाठी कर्मचाऱ्यांच्या परिसरात फेऱ्या.