Top 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा : 16 June 2024: ABP Majha
Top 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा : 16 June 2024: ABP Majha
आज यूपीएससीची पूर्व परीक्षा होणार. लोकसभा निवडणुकीमुळे परीक्षा उशीरानं.
यूपीएससी परीक्षेत संभाजीनगरमध्ये गोंधळ, गुगल मॅपच्या चुकीमुळे यूपीएससीचे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित, इतर जिल्ह्यातून आलेल्या विद्यार्थ्यांचे अश्रू अनावर.
आज महाराष्ट्र सीईटीचा निकाल जाहीर होणार, अभियांत्रिकी, फार्मसी प्रवेशाच्या सीईटीच आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून निकाल पाहता येणार.
एनसीईआरटीच्या १२वीच्या राज्यशास्राच्या पुस्तकातून बाबरी मशीद हद्दपार, अयोध्या वादाचे ऐतिहासिक संदर्भही बदलले, बाबरी मशिदीचा ‘तीन घुमट असलेला ढाचा’ असा उल्लेख.
चंद्रकांत पाटलांनी येत्या जूनपासून राज्यातील मुलींना मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली होती, मात्र ही घोषणा हवेत जिरली असून विद्यार्थिनींना शिक्षणासाठी फी भरावी लागतेय, चंद्रकांत पाटलांच्या घोषणेमुळे विद्यार्थी आणि महाविद्यालयांमध्ये वाद होत असल्याचं समोर.
कथित कलिना भूखंड गैरव्यवहार प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाची छगन भुजबळांना तंबी, सुनावणीसाठी हजर राहा, अन्यथा वॉरंट बजावणार, भुजबळांना न्यायालयाचा इशारा.