(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 29 जुलै 2024: ABP Majha
उद्धव,आदित्य,पवारांवर आरोप करण्यासाठी फडणवीसांनी माझ्यावर दबाव आणला होता, अनिल देशमुखांचा दावा, मी आरोप केले असते तर आदित्य,उद्धव ठाकरे आज जेलमध्ये असते, देशमुख फडणवीसांवरच्या आरोपांवर ठाम.
'बीजेपी में आओ,या जेल में जाओ' अशी भाजपकडून ऑफर होती, अनिल देशमुखांचा पत्रकार परिषदेत दावा.
समित कदम फडणवीसांच्या जवळचा माणूस असं सांगत देशमुखांनी दाखवले फडणवीस-समितचे एकत्रित फोटो, 'समित कदमला ५ ते ६ वेळा फडणवीसांनी पाठवून खोटे आरोप करण्यास सांगितलं, परंतु 'खोटे आरोप करायला स्पष्ट नकार दिल्याचं देशमुखांचं स्पष्टीकरण.
'आदित्यवर दिशा सालियानप्रकरणी आरोप करायला सांगितले', 'घाणेरड्या राजकारणासाठी फडणवीसांनी नेत्यांच्या मुलांनाही सोडले नाही', अनिल देशमुखांचं विधान.
सरकारी योजनांना प्रसिद्धी मिळू नये म्हणून अनिल देशमुख खोट्या बातम्य़ा सोडतायत, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची टीका, तर देशमुखांना बातमीरत्न पुरस्कार देण्यात यावा अशीही खोचक टीका.
अनिल देशमुखांनी केलेला खुलासा गंभीर, समित कदमला वाय दर्जाची सुरक्षा का दिली?, खासदार संजय राऊतांचा सवाल
समित कदमचा भाजप आणि संघाशी संबंध, खासदार राऊतांचं वक्तव्य, तर राऊतांनी फडणवीस आणि समित कदमांच्या भेटीचे फोटो दाखवले.
निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांकडून दंगल घडवण्याची भाषा, ते चांगलं नाही, तर तेढ निर्माण करणाऱ्यांना रोखण्यासाठी पवारांनी पुढाकार घ्यावा, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया.