Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 1 PM : 17 ऑक्टोबर 2024: ABP Majha
Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 1 PM : 17 ऑक्टोबर 2024: ABP Majha
केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र आणि झारखंड राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा केल्यानंतर राजकीय पक्षांमधील घडामोडी वाढल्या आहेत. झारखंडमध्ये सध्या झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेससह मित्र पक्षांच्या आघाडीचं सरकार आहे. झारखंडमध्ये भाजप विरोधी पक्षात आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून जागा वाटपावर चर्चा करण्यात येत आहेत. झारखंडमधील एनडीएचा जागा वाटपाचा फॉर्म्युला आता अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती आहे. भाजपचा मित्र पक्षांसह झारखंडची विधानसभा निवडणूक लढवण्याचा प्रयत्न आहे. या राज्यात त्यांच्यासोबत जदयू, लोक जनशक्ती पार्टी रामविलास आणि आजसू हे पक्ष आहेत. या पक्षांसोबत भाजपच्या जागा वाटपाच्या चर्चा सुरु आहेत. जागा वाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे. भाजप 69 जागा लढवण्याची शक्यता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजप 69 जागांवर निवडणूक लढवेल. जदयूला 2 जागा, आजसूला 9 जागा मिळतील. चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टी रामविलास पार्टीला एक जागा मिळू शकते. मित्र पक्षांची अजून काही जागा मिळण्यासंदर्भात मागणी आहे. जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. एनडीएच्या घटकपक्षांच्या बैठकांचं सत्र सुरु आहे. विधानसभा निवडणुकीला एकत्र सामोरं गेल्यास गेल्या निवडणुकीपेक्षा चांगलं यश मिळेल आणि सरकार स्थापनेची संधी मिळेल, असं एनडीएतील पक्षांना वाटत आहे.