Top 25 : टॉप 25 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 03 ऑगस्ट 2024 : ABP Majha : 6 PM
Top 25 : टॉप 25 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 03 ऑगस्ट 2024 : ABP Majha : 6 PM
कुख्यात गुंड अबू सालेमसाठी मनमाड रेल्वे स्थानक केलं होतं पूर्ण रिकामं, कडक पोलीस बंदोबस्तात अबू सालेमची नाशिक कारागृहात रवानगी.
राज्यात पुढील दोन दिवस पावसाचं धुमशान, संपूर्ण कोकणासाठी ऑरेंज अलर्ट जारी, हवामान खात्याचा अंदाज.
रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर, रायगड जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट.
तळकोकणात पावसाचा जोर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस, तर पुढील २४ तासांता पावसाचा जोर वाढण्याची शक्यता.
कसारा घाटात रेल्वे मार्गावर कोसळली दरड, मुंबईकडे येणाऱ्या तिसऱ्या रेल्वे मार्गिकेवर दरड कोसळल्याने नाशिकहून मुंबईकडे येणाऱ्या गाड्या मधल्या मार्गिकेवर वळवल्या.
नंदुरबार जिल्ह्यातील दोन महत्त्वाचा तालुक्यांना जोडणाऱ्या चांदशैली घाटात पुन्हा दरड कोसळली, कोणतीही दुर्घटना नाही, मात्र, वाहतुकीवर परिणाम.
रायगडच्या कोलाड रोहा राज्य मार्गावर रस्त्याला भगदाड, वाहन चालकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास, खचलेला भाग बुजवण्याची प्रवाशांची मागणी.
भंडाऱ्यातील राष्ट्रीय महामार्गावर महेंदी पुलिया परिसरात रस्त्याची अक्षरशाह चाळण, अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल, त्यामुळे वाहन चालकांची चांगलीच कसरत.