Top 25 Superfast News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : एबीपी माझा : 5 Pm
Top 25 Superfast News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : एबीपी माझा : 5 Pm
ही बातमी पण वाचा
'आपल्या महाराष्ट्रात ही घाण नकोच!' रेल्वेतील 'त्या' घटनेवर हेमंत ढोमेचा संताप, अभिनेत्री पूजा भट्टकडूनही कारवाईची मागणी
Social Media : सोशल मीडियावर (Social Media) 31 ऑगस्ट रोजी व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे पुरोगामी महाराष्ट्रावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं. आपल्या लेकीच्या भेटीसाठी जाणाऱ्या एका वृद्ध माणसाला बीफ घेऊन जात असल्याच्या संशयावरुन रेल्वेत तरुणांनी मारहाण केली. या घटनेवर अनेकांनी सोशल मीडियाच्याच माध्यमातून रोष व्यक्त केला. त्याचप्रमाणे या प्रकरणात दोषी असणाऱ्यांवर कारवाई देखील मागणी होऊ लागली. या सगळ्यावर अभिनेता हेमंत ढोमे (Hemant Dhome) आणि अभिनेत्री पूजा भट्ट (Pooja Bhatt) यांनी देखील पोस्ट करत घटनेचा निषेध केला होता.
या सगळ्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विट करत दोषींवर कारवाई केली असल्याची माहिती दिली. तसेच राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अशा कोणत्याही घटनांना थारा मिळणार नसल्याचंही त्यांनी म्हटलं. ज्या महाराष्ट्रात जातीयवाद नाही, त्याच महाराष्ट्रात अशा घटना किती लज्जास्पद आहे, अशा आशयाची प्रतिक्रिया उमटत आहे.
हेमंत ढोमेची पोस्ट काय?
हेमंत ढोमेने सुरुवातीला हा व्हिडीओ पोस्ट करत म्हटलं होतं की, नका रे नका… आपल्या महाराष्ट्रात हे सगळं करू नका! विचलित आणि सुन्न करणारं आहे हे चित्र! आपला महाराष्ट्र असा नव्हता आणि असा होऊ द्यायचा नाहीय… कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई होणार का? तसेच हेमंतने त्याच्या पोस्टमध्ये अजित पवारांना टॅग करत तुम्ही तरी कठोर कारवाई कराल बाकी लोकांकडून अशा अपेक्षा नाहीत, असं म्हटलं होतं.