Top 100 News : शंभर हेडलाईन्स : वेगवान बातम्यांचं आढावा : 22 फेब्रुवारी 2024 : ABP Majha
Top 100 News : शंभर हेडलाईन्स : वेगवान बातम्यांचं आढावा : 22 फेब्रुवारी 2024 : ABP Majha
उसाच्या खरेदी दरात ८ टक्के वाढ करण्याचा केंद्रीय कॅबिनेट बैठकीत निर्णय, उसाचा खरेदी दर प्रतिक्विंटल ३१५ वरुन ३४० रुपयांवर, दिल्लीत शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मोठा निर्णय.
अंतराळ क्षेत्रात FDI धोरणात सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी, सुधारित FDI धोरणांतर्गत अंतराळ क्षेत्रात १०० टक्के FDI ला परवानगी.
काजू प्रक्रिया उद्योगांना राज्य वस्तू व सेवा कराचा परतावा ५ मार्चपूर्वी द्यावा, आणि केंद्रीय वस्तू व सेवा कराची अडीच टक्के रक्कम राज्य शासनातर्फे तातडीने परत करावी, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आढावा बैठकीत निर्देश.
महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषिक नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्याकडून समन्वयक मंत्र्यांची नेमणूक, मंत्री शंभूराज देसाईंची महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत माहिती.
बारामतीतील ESIC च्या २०० खा टांच्या रुग्णालयासाठी ‘MIDC मार्फत वाढीव जमीन उपलब्ध करुन द्या, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आढावा बैठकीत निर्देश.
मुळशी धरणाची उंची वाढविण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बैठकीत निर्देश, यामुळे मुळशी परिसरासह पुण्याच्या पश्चिम भागाला अतिरिक्त पाणीपुरवठा होणार.