एक्स्प्लोर
Thane Traffic Alert: घोडबंदरवर 'नो एन्ट्री', Gaimukh Ghat दुरुस्तीमुळे मंगळवारपर्यंत वाहतुकीत बदल
ठाणे (Thane) घोडबंदर मार्गावरील (Ghodbunder Road) गायमुख घाटामध्ये (Gaimukh Ghat) रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे प्रचंड वाहतूककोंडी झाली आहे. या कामामुळे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरही (Mumbai-Ahmedabad Highway) सातिवलीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मिरा-भाईंदर महापालिकेकडून (MBMC) हे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून, ते मंगळवारी, १४ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत चालणार आहे. या काळात जड वाहनांना बंदी घालण्यात आली असून, वाहतूक पर्यायी मार्गांनी वळवण्यात आली आहे. मात्र, हलकी वाहने आणि अत्यावश्यक सेवांसाठी मार्ग खुला ठेवण्यात आला आहे. या वाहतूककोंडीचा मोठा फटका वाहनचालकांना बसला असून, दोन्ही लेनवर वाहनांची गर्दी झाली आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अकोला
मुंबई
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement


















