Thane महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मंत्री Jitendra Awhadआणि Eknath Shinde यांच्यात वाग्युद्ध
ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यात वाग्युद्ध सुरु झालं आहे. ठाणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षाची सूत्रं अनुक्रमे आव्हाड आणि शिंदे यांच्या हातात आहेत. त्यामुळं त्या दोघांमधल्या वाग्युद्धाकडे महाविकास आघाडीचे पाठीराखे आश्चर्यानं पाहात आहेत. ठाणे महापालिकेत शिवसेनेनं अहंकारामुळं हातचं सगळं घालवू नये असा सल्ला आव्हाडांनी काल आपल्या विद्यमान मित्रपक्षाला दिला होता. त्यावर बोलताना, शिवसेना फायदातोट्याचा विचार करत नाही असं उत्तर मंत्री एकनाथ शिंदे यांनी आव्हाडांना दिलं आहे. तसंच महाविकास आघाडीत कुणाची मनं दुखवणार नाहीत याचा विचार करावा असाही सल्ला शिंदेंनी आव्हाडांना दिला आहे.



















