एक्स्प्लोर
Thackeray Brothers Unite | Worli Dome बाहेर गेट तोडून कार्यकर्त्यांचा जल्लोष
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे वीस वर्षांनंतर एकत्र येणार असल्याने वरळी डोमबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या गर्दीमुळे पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात ठेवणे कठीण झाले. कार्यकर्ते गेट तोडून आतमध्ये घुसले. मुंबई आणि मुंबईबाहेरून, गोरेगाव, सांताक्रुझ, पुण्याहून मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष कार्यकर्ते Raj-Uddhav यांना एकत्र पाहण्यासाठी आले होते. धावपळीत एक महिला जखमी झाली. बाळा नांदगावकर आणि यशवंत किल्लेदार यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले, परंतु गर्दीने त्यांचे ऐकले नाही. 'आजचा आजचा विजयी मेळावा फक्त मराठी माणसाचा आहे, बीआयपीचा नाहीये,' असे एका कार्यकर्त्याचे म्हणणे होते. वरळी डोमच्या सभागृहाची क्षमता आठ ते दहा हजार असून, बाहेर स्क्रीन आणि स्पीकर लावण्यात आले आहेत. राज ठाकरे त्यांच्या कुटुंबियांसह निघाले असून, उद्धव ठाकरेही लवकरच मातोश्रीवरून रवाना होतील. सकाळी अकरा वाजता कार्यक्रमाची वेळ होती, मात्र गर्दीचे नियोजन हे मोठे आव्हान आहे. गेट पुन्हा बंद करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र
CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग

एबीपी माझा वेब टीम
Opinion




















