एक्स्प्लोर
Tesla India Launch: मुंबईत Tesla ची एंट्री, CM फडणवीसांच्या हस्ते शोरूम उद्घाटन, EV मार्केटमध्ये स्पर्धा
जगप्रसिद्ध इलेक्ट्रिक कार ब्रँड Tesla ने भारतात प्रवेश केला आहे. मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथे Tesla चे पहिले शोरूम सुरू झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या शोरूमचे उद्घाटन झाले. यावेळी Tesla च्या दोन नव्या गाड्यांचे लाँचिंगही करण्यात आले. भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा ऑटोमोबाईल मार्केट असलेला देश आहे. सध्या इलेक्ट्रिक गाड्यांची विक्री देशात वाढत आहे. त्यामुळे Tesla ने भारतात जम बसवण्यासाठी पहिले पाऊल टाकले आहे. "महाराष्ट्र हे ई वी करिता, इलेक्ट्रिक मोबिलिटी करिता आता फेवरिट डेस्टिनेशन झाला आहे," असे उद्घाटनावेळी सांगण्यात आले. Tesla च्या गाड्यांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान, ऑटोपायलोट फीचर्स, मोठे टच स्क्रीन आणि सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत. सुपर चार्जर नेटवर्कमुळे गाड्या जलद गतीने चार्ज होतात. या गाड्या एका चार्जमध्ये तब्बल 622 किलोमीटर धावू शकतात आणि 0 ते 100 किलोमीटर प्रतितास वेग अवघ्या 5.6 सेकंदात गाठतात. 15 मिनिटांच्या सुपर चार्जिंगमध्ये 267 किलोमीटरची रेंज मिळते. भारतीय मार्केटमध्ये Tesla ला Hyundai, BMW, Audi आणि Mercedes सारख्या ब्रँडशी स्पर्धा करावी लागणार आहे. Tesla च्या लाँच केलेल्या मॉडेल्सची किंमत 60 ते 70 लाखांच्या घरात आहे. Tesla ची भारतात एंट्री उशिराने झाली असली तरी, कंपनी मुंबईनंतर दिल्लीसह अनेक शहरांमध्ये नेटवर्क विस्तारणार आहे.
महाराष्ट्र
Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
Narayan Rane Sindhudurg Speech : आता घरी बसायचं...नारायण राणेंचा राजकीय सन्यास, भावनिक भाषण UNCUT
Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Aaditya Thackeray on Coffee With Kaushik : Raj-Uddhav ठाकरे बंधू विरोधकांना सपाट करणार: आदित्य ठाकरे
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
भारत
निवडणूक






















