Teacher beating students Viral Video :विद्यार्थ्याला लाथा बुक्क्यांनी अमानुष मारहाण, व्हिडीओ व्हायरल
Viral Video : आपल्या मुलाने शिकावं, मोठं व्हावं असं प्रत्येक आई-वडिलांना वाटत असतं. त्यासाठी मुलाला चांगल्या शाळेत प्रवेश घेतला जातो. त्यासोबतच मुलाला बाहेरची शिकवणी देखील लावली जाते. मुलाच्या शिक्षणासाठी आई-वडील जिवाचे रान करत असतात. शिक्षकांना देखील आपल्या विद्यार्थ्याने शिकावं असं वाटत असतं. त्यासाठी विद्यार्थ्याकडून छोटी-मोठी चूक झाल्यानंतर शिक्षक त्यांना शिक्षा देखील करतात. एखाद्या चुकीसाठी विद्यार्थ्याला बेशुद्ध होईपर्यंत मारले जात नाही. परंतु, असाच एक प्रकार नुकताच समोर आला आहे. कोचिंग क्लासच्या एका शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली आहे. फक्त मारहाण नाही तर तो विद्यार्थी बेशुद्ध होईपर्यंत त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे
महत्त्वाच्या बातम्या






















