Tarapur Fire : बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील कारखान्यात भीषण आग, स्फोटांनी परिसर हादरला
पालघर : बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील प्लॉट नंबर 9/5 मधील रंग रसायन कंपनीला मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली होती. ही आग आटोक्यात आली असून कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. मध्यरात्री साडेतीन वाजेच्या सुमारास अचानक ही आग लागून मोठे स्फोट झाले. आजूबाजूचा परिसरामध्ये या स्फोटांचे आवाज झाले. गेल्या आठवडाभरामध्ये या औद्योगिक कार्यक्षेत्रातील दुसरी दुर्घटना असून संबंधित प्रशासनाचं दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे. ही आग लागली तेव्हा सुदैवाने कारखान्यात कोणतेही कामगार नव्हते. त्यामुळे जीवितहानी झाली नाही. सध्या आग विझवण्यात आली असून कुलिंगचं काम सुरू आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
अग्निशामक दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी आल्या. त्यांनी या आगीवर नियंत्रण मिळवलं. यावेळी बोईसर पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
![ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 17 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/f50b4dd4432551bcdd60230fe713f9e21739814514058977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)