(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Taloja Water Issue : तळोजात अनियमीत पाणीपुरवठा, तळोजावासियांचा तहान मोर्चा
तळोजातल्या नागरिकांनी खारघरच्या सिडको विभाग कार्यालयावर तहान मोर्चा काढत पाण्याच्या प्रश्नावर आंदोलन केलं. तळोजावासियांनी सिडको अधिकाऱ्यांना रिकामी घागर पुरस्कार म्हणून देऊन हे आंदोलन केलं. सिडकोनं तळोजा परिसरात मोठ्या प्रमाणावर गृहप्रकल्प उभारले आहेत. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सिडकोनं तळोजा परिसरात अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी हजारो घरं उभारली आहेत. पण ही घरं उभी करताना, तिथं येणाऱ्या रहिवाशांसाठीच्या पाणीपुरवठ्याबाबत सिडकोनं नियोजन केलेलं नाही. एकीकडे सिडकोचा पाण्यासाठी नियोजनशून्य कारभार दिसत असताना दुसरीकडे पनवेल महापालिकेनंही तळोजाच्या रहिवाशांना पाणी देण्याच्या मुद्द्यावर हात वर केले आहेत. त्यामुळं ऐन पावसाळ्यात तळोजाच्या नागरिकांना पाणीटंचाईला सामोरं जावं लागत आहे. तळोजा परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून अनियमित आणि कमी प्रमाणावर पाणी पुरवठा होत आहे. पण अनेक आंदोलनं करुनही सिडको पाणी प्रश्न सोडवताना दिसत नाही.