FRP Maharashtra : एकरकमी एफआरपीवरून स्वाभिमानी आक्रमक, ऊस नेणारे ट्रॅक्टर कार्यकर्त्यांनी पेटवले
एकरकमी एफआरपीच्या मागणीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेंचे सांगली जिल्हयात हिंसक आंदोलन सूरु झालेय. ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून मध्यरात्री पेटवलेत. त्यमुळे एकरकमी एफआरपी जाहीर न करणाऱ्या कारखान्याना स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांकडून लक्ष्य केले गेले असल्याचे दिसून येत आहे. वाळवा तालुक्यातील तांदूळवाडी मध्ये आणि कडेगाव तालुक्यात ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून पेटवण्याचा प्रयत्न झालाय. राजारामबापू, क्रांती या कारखान्यासाठी ऊस घेऊन जाणारे ट्रॅक्टर पेटविण्यात आले तर विश्वास कारखान्या ट्रॅक्टर पेटविण्याचा प्रयत्न झालाय.





















