एक्स्प्लोर

Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड

Nashik Crime News: अवैध गुटखा तस्करीसाठी गुन्हेगार नवनवीन आणि थक्क करणाऱ्या क्लृप्त्या शोधत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

Nashik Crime News: अवैध गुटखा तस्करीसाठी गुन्हेगार नवनवीन आणि थक्क करणाऱ्या क्लृप्त्या शोधत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. नाशिकच्या देवळा तालुक्यातील विठेवाडी येथे ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे एका अशा हायटेक तस्करीचा पर्दाफाश झाला आहे, जिथे पोलिसांना चकवा देण्यासाठी थेट रिमोट कंट्रोल तंत्रज्ञानाचा वापर केला जात होता. या धडक कारवाईत देवळा पोलिसांनी सुमारे 14 लाख 92 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका संशयिताला अटक केली आहे, तर मुख्य सराईत तस्कर पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे.

Nashik Crime News: रिमोट दाबले की नंबर प्लेट गायब

या कारवाईत पोलिसांनी जेव्हा संशयित मारुती सुझुकी इर्टिगा कारची तपासणी केली, तेव्हा पोलीसही चक्रावून गेले. तस्करांनी पोलिसांची आणि सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी वाहनाच्या पुढच्या आणि मागच्या नंबर प्लेटवर रिमोटद्वारे नियंत्रित होणारा एक काळा पडदा बसवला होता. रस्त्यावर पोलीस दिसताच गाडीतील रिमोटचे बटण दाबायचे आणि काही क्षणांत नंबर प्लेट पूर्णपणे झाकली जायची. या अत्याधुनिक युक्तीमुळे आजवर ही कार पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार होत होती.

Nashik Crime News: ग्रामस्थांनी गाडी अडवली अन् तस्करीचा भांडाफोड झाला

बुधवारी रात्री विठेवाडीच्या आहेर वस्तीजवळ या इर्टिगा कारच्या संशयास्पद हालचाली ग्रामस्थांच्या नजरेस पडल्या. त्यांनी तातडीने एकजूट दाखवून वाहन अडवले आणि देवळा पोलिसांच्या स्वाधीन केले. नाशिक विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी चेतन परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, या वाहनातून मोठ्या प्रमाणावर विमल पानमसाला आणि व्ही-1 तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या गुटख्याची किंमत 4 लाख 92 हजार 200 रुपये असून, 10 लाख रुपयांची कार मिळून एकूण 14 लाख 92 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Nashik Crime News:  एकाला अटक, सराईत गुन्हेगारावर 'मोक्का' लावण्याची तयारी

या प्रकरणी पोलिसांनी हेमंत प्रभाकर पवार या संशयिताला अटक केली आहे. मात्र, मुख्य सराईत गुटखा तस्कर कुणाल संजय मेने हा घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. फरार आरोपी कुणाल मेने याच्याविरुद्ध यापूर्वीच देवळा, वणी आणि दिंडोरी पोलीस ठाण्यांमध्ये गुटखा तस्करीचे 5 गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो संघटितपणे हा गुन्हा करत असल्याने त्याच्याविरुद्ध 'मोक्का' अंतर्गत कडक कारवाई करण्याची मागणी अन्न व औषध प्रशासनाने केली आहे. देवळा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Nashik TCS Case Nida Khan: निदा खानला जामीन देताना भगवान श्रीकृष्णाचा दाखला, कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी; नेमकं काय घडलं?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
धक्कादायक! चार जणांच्या टोळक्यानं युवकाला जागीच संपवलं, नांदेडच्या ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीतच घडली घटना
धक्कादायक! चार जणांच्या टोळक्यानं युवकाला जागीच संपवलं, नांदेडच्या ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीतच घडली घटना
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
Advertisement

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
Embed widget