एक्स्प्लोर

आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची कौतुकास्पद कामगिरी, चोराचा व्हिडिओ केला चित्रित, पोलिसांकडून प्रशस्तीपत्र आणि रोख रक्कम देऊन सन्मान

रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी गावातील एका आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. कारण या विद्यार्थ्याने घरात बसून मोबाईलवर चोरी करणाऱ्या चोराचा व्हिडिओ चित्रित केला आहे.

Ratnagiri :  रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी गावातील एका आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. कारण या विद्यार्थ्याने घरात बसून मोबाईलवर चोरी करणाऱ्या चोराचा व्हिडिओ चित्रित केला आहे. सर्वेश मायंगडे असं या विद्यार्थ्याचे नाव आहे. या विद्यार्थ्याने रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओच्या आधारे घरात चोरी करणारा चोराला पडकडण्यात पोलिसांना यश मिळालं आहे. 

रत्नागिरी पोलिसांनी केला विद्यार्थ्यांचा गौरव

दरम्यान, रत्नागिरी तालुक्यातल्या जाकादेवी गावात ही घटना घडली आहे. चोरी झालेल्या गावापासून मुंबई गोवा हायवे वर असलेल्या निवळी गावापर्यंत चोराचा पाठलाग करण्यात आला. दरम्यान, विद्यार्थ्याने घरात बसून मोबाईलवर चोरी करणाऱ्या चोराचा व्हिडिओ चित्रित केला आहे. या आधारे पोलिसांनी कारवाई केली. यानंतर रत्नागिरी पोलिसांनी विद्यार्थ्यांचा गौरव केला आहे. या विद्यार्थ्याला 5 हजार रुपयांचं रोख बक्षीस देण्यात आलं आहे. 

पोलीस स्टेशन मार्फत प्रशस्तीपत्र व रोख रक्कम पाच हजार रुपयांचे रोख पारितोषिक

रत्नागिरी तालुक्यातील तात्यासाहेब मुळये माध्यमिक विद्यालय जाकादेवी येथील इयत्ता 8 वी मध्ये शिकत असलेल्या तसेच तरवळ येथील सर्वेश संदेश मायंगडे यांनी चोरी करणाऱ्या चोराला पकडून देण्याच्या महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. याबद्दल रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्या हस्ते कौतुकाची थाप देण्यात आली आहे. या धाडसी व जिज्ञासू विद्यार्थ्याला ग्रामीण पोलीस स्टेशन मार्फत प्रशस्तीपत्र व रोख रक्कम पाच हजार रुपयांचे  रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.

गेल्या काही दिवसांपूर्वी तरवळ मायंगडेवाडी येथील एका घरात चोर घुसून चोरी करत असल्याचे सर्वेशच्या दृष्टीस आले. त्यानंतर सर्वेशने मोठ्या कौशल्याने आपल्या मोबाईलच्या माध्यमातून या चोराचे मोबाईलद्वारे चित्रीकरण करून चोरी झालेल्या मालकाला फोनवरती माहिती देऊन त्या चोराचा मोटर सायकलवरून घर मालकासमवेत धैयाने पाठलाग करत निवळी येथे गाठले. चोरी करणाऱ्या व्यक्तीला विचारले तू कोठे जात आहेस? तो बोलला हातखंबा या ठिकाणी एका माणसाला भेटायला चाललो आहे. सर्वेशचे एवढे धाडस की, जीवाची पर्वा न करता मी पण येतो असे सांगून त्या चोराच्या मोटरसायकलवर बसला. मागोमाग ज्यांच्या घरी चोरी झाली ती व्यक्ती होती. हातखंबा गाव संपल्यावर चोराने कु‌ सर्वेशला हळूच गाडीवरून खाली ढकळून त्याने पलायन करण्याचा प्रयत्न केला. मात्र सर्वेश मायंगडे याने नजिकच्या हातखंबा ग्रामस्थांच्या सहकार्याने पोलिसांच्या सदर चोरीची बाब निदर्शनास आणून देत पुरावा सादर केला. या चोराने सुमारे दोन घरांतून सुमारे 43 हजारांची रोकड लंपास केली होती.ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी सदर चोराला पकडून ताब्यात घेतले.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
तुम्ही गद्दार म्हणत राहा; तुमचा पक्ष संपतोय, शिंदेंचे आमदार-खासदार वाढतायत, रामदास कदमांचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल
तुम्ही गद्दार म्हणत राहा; तुमचा पक्ष संपतोय, शिंदेंचे आमदार-खासदार वाढतायत, रामदास कदमांचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Advertisement

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
Mumbai Rain news: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
Embed widget