एक्स्प्लोर

Rajpal Yadav : 85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!

Rajpal Yadav Cheque Bounce Case Jail Sentence : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता राजपाल यादवला दिल्ली उच्च न्यायालयाने चेक बाऊन्स प्रकरणात 3 महिन्यांची शिक्षा सुनावली आहे.

मुंबई : बॉलिवूडमध्ये आपल्या अचूक टायमिंग आणि विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना खळखळवून हसवणारा अभिनेता राजपाल यादव (Rajpal Yadav) सध्या एका गंभीर कायदेशीर अडचणीत सापडल्याचं दिसतंय. चेक बाऊन्स (Cheque Bounce Case) प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) राजपाल यादव याला 7 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये प्रत्येकी 3-3 महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच त्याच्यावर 7.35 कोटी रुपयांचा मोठा दंडही ठोठावला आहे.

मात्र, एवढी मोठी संपत्ती आणि कोट्यवधींचे प्रोजेक्ट्स हातात असतानाही राजपाल यादवला अवघ्या काही कोटींसाठी तुरुंगात का जावं लागत आहे? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. यावर स्वतः राजपाल यादवने यावर भाष्य केलं असून, हा वाद पैशांचा नसून ईगो आणि प्रगतीवर जळण्याच्या वृत्तीचा असल्याचा दावा त्याने केला आहे.

Rajpal Yadav Net Worth : 85 कोटींची संपत्ती आणि महागड्या गाड्या

अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजपाल यादवची आर्थिक स्थिती अत्यंत मजबूत आहे. त्यांची एकूण संपत्ती (Net Worth) अंदाजे 50 ते 85 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. तो केवळ चित्रपटांमधूनच नव्हे, तर रिअल इस्टेट आणि वेगवेगळ्या गुंतवणुकीच्या माध्यमातून मोठी कमाई करतो. ब्रँड एंडोर्समेंटच्या माध्यमातून तो वर्षाला 30 ते 35 लाख रुपये कमावतो. त्याच्या ताफ्यात ऑडी (Audi) आणि बीएमडब्ल्यू (BMW) सारख्या अत्यंत महागड्या आणि लक्झरी गाड्या आहेत.

विशेष म्हणजे, राजपाल यादव सध्या एका चित्रपटासाठी कोट्यवधी रुपये मानधन घेतो. 'भूल भुलैया 3' मधील 'छोटा पंडित' या त्यांच्या लोकप्रिय भूमिकेसाठी त्याने सुमारे 1.25 कोटी रुपये मानधन घेतलं होते. तर आगामी 'वेलकम टू द जंगल'साठी 1 ते 2 कोटी रुपये आणि 'भूत बंगला' या चित्रपटासाठी त्याने 1 ते 1.5 कोटी रुपये फी घेतल्याची माहिती आहे. एका मुलाखतीत त्याने सांगितले की, सध्या त्यांच्याकडे तब्बल 1200 कोटी रुपयांचे मोठे प्रोजेक्ट्स रांगेत आहेत.

Rajpal Yadav Case History : नेमकं काय आहे प्रकरण? 

शुभांकर मिश्रा यांच्या एका प्रसिद्ध पॉडकास्टमध्ये बोलताना राजपाल यादवने या वादावर सविस्तर स्पष्टीकरण दिले. तो म्हणाले की, "हा केवळ 5 कोटी रुपयांचा विषय असता, तर तो 2012 मध्येच संपला असता. पण या 5 कोटी रुपयांच्या वादाने माझे तब्बल 17 कोटी रुपये बुडवले. आम्ही एकत्र मिळून 22 कोटी रुपयांचा एक चित्रपट प्रकल्प (Project) सुरू केला होता. त्यावर 12 कोटी रुपये आधीच खर्च झाले होते आणि 70 टक्के चित्रपट तयार झाला होता. मात्र, समोरच्या कंपनीच्या चुकीच्या हेतूमुळे (Wrong Intention) तो प्रकल्प मध्येच रखडला आणि चित्रपट बुडाला."

जोपर्यंत प्रेक्षक किंवा जनता एखाद्या चित्रपटाला नाकारत नाही, तोपर्यंत तो प्रकल्प थांबवण्याचा अधिकार कोणालाही नसतो. पण 2012 पासून समोरच्या पार्टीचा हेतूच वाईट होता, असा गंभीर आरोपही त्याने केला.

Actor Rajpal Yadav News : पैशांची नाही, ही तर अहंकाराची लढाई

राजपाल यादवने एका वृत्तपत्राशी बोलताना त्याच्या विरोधात तक्रार करणाऱ्यांवर कडाडून टीका केली. तो म्हणाला की, "कधीकधी काही प्रकरणे ही पैशांपेक्षा जास्त समोरच्या व्यक्तीच्या जळफळाटातून निर्माण होतात. त्यांना माझ्या नावाचा वापर करून प्रसिद्धी मिळवायची होती, ती त्यांना मिळाली. हा वाद आता पैशांचा राहिला नसून पूर्णपणे ईगोचा बनला आहे."

या प्रकरणात आता तडजोड किंवा मध्यस्थी होणार का? असे विचारले असता त्यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला. आता तडजोडीचा प्रश्नच उरत नाही. तडजोड तेव्हा होते जेव्हा लढाई दोन्ही बाजूंनी समान असते. इथे तर एका बाजूने पूर्ण कट रचण्यात आला होता. आता मी पूर्णपणे न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे. न्यायालय जो देईल तो निकाल मला मान्य असेल," असं राजपाल यादवने शेवटी सांगितले.

ही बातमी वाचा :

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Filmfare 2026: फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
Thalapathy Vijay Sangeetha: मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
Mithun Chakraborty Surgery Health: अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
Raveena Tandon Dog Video: 'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO
'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO
Advertisement

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget