चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
Thar to drag an India One ATM: गुन्हेगारांनी किऑस्कपासून सुमारे 300 मीटर अंतरावर रस्त्याच्या कडेला ते खराब झालेले एटीएम सोडून दिले आणि पसार झाले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

Thar to drag an India One ATM: ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील तुडीगढिया बाजार येथे एखाद्या चित्रपटाप्रमाणे एटीएम दरोड्याची घटना घडली. आज (11 जुलै) मध्यरात्री रात्री सुमारे 2 वाजता तीन ते चार गुन्हेगार एका काळ्या महिंद्रा थार एसयूव्हीमधून इंडिया1 एटीएम किऑस्कजवळ आले. त्यांनी किऑस्कचा दरवाजा तोडून एटीएम बाहेर काढले आणि एका दोरीने ते थारला बांधले. त्यानंतर ते एटीएम रस्त्यावरून ओढू लागले, पण दोरी तुटली. चोरांनी ते मशीन उचलून गाडीत ठेवण्याचा प्रयत्न केला, पण ते इतके जड होते की त्यांना ते उचलता आले नाही. मग त्यांनी ते पुन्हा गाडीला बांधले आणि आणखी पुढे ओढत नेले.
एटीएममधून एकही रुपया चोरीला गेला नाही
एका निर्जन ठिकाणी पोहोचल्यावर, आरोपींनी एटीएम तोडून त्यातील रोकड काढण्याचा प्रयत्न केला, पण ते अयशस्वी ठरले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, एटीएममधून एकही रुपया चोरीला गेला नाही. अखेरीस, गुन्हेगारांनी किऑस्कपासून सुमारे 300 मीटर अंतरावर रस्त्याच्या कडेला ते खराब झालेले एटीएम सोडून दिले आणि पसार झाले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
In a brazen heist attempt in Balasore, Odisha miscreants reportedly used a Mahindra Thar to drag an India One ATM nearly 200 meters before abandoning it by the roadside.
— contentkikamii (@contentkikamii) July 11, 2026
The entire incident was captured on CCTV. Police along with forensic teams have launched a comprehensive… pic.twitter.com/co2hoULvLr
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू
शनिवारी सकाळी घटनेची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि रस्त्यावरून एटीएम जप्त केले. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाची आणि एटीएमची तपासणीही केली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, गुन्हेगारांना एटीएममधून फक्त एक रुपया काढता आला नाही. गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे.
इतर महत्वाच्या बातम्या





















