एक्स्प्लोर
Sushma Andhare : अंधारेंसोबत फटाक्यांची खरेदी, कोणत्या नेत्याला कोणते फटाके भेट देणार?
शिवसेनेच्या (UBT) नेत्या सुषमा अंधारे यांनी 'राजकीय आतिषबाजी' या कार्यक्रमात दिवाळीच्या फटाक्यांची रूपके वापरून राजकीय नेत्यांवर जोरदार टीका केली. 'देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणजे एक फुगाफुस कार्यक्रम आहे', असे म्हणत अंधारेंनी त्यांना मोठा पण न वाजणारा 'आईचा गाव' फटाका भेट दिला. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची उपयुक्तता संपल्याचे सांगत त्यांची तुलना छोट्या टिकल्यांशी केली, तर रामदास कदम (Ramdas Kadam) जागेवरच गोल फिरणाऱ्या भुईचक्रासारखे आहेत, असा टोला लगावला. किरीट सोमय्यांना (Kirit Somaiya) त्यांनी आदेशानुसार फणा काढणारी आणि खाली घेणारी 'नाग गोळी' दिली. या राजकीय फटकेबाजीत त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे (Thackeray Brothers) एकत्र आल्यास ते 'अॅटम बॉम्ब' ठरतील, असे महत्त्वपूर्ण विधान केले.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















