Sushama Andhare On Badlapur Case : महाराष्ट्र सुरक्षित नाही, देवेंद्र फडणवीस राजीनामा का देत नाहीत?
Sushama Andhare On Badlapur Case : महाराष्ट्र सुरक्षित नाही, देवेंद्र फडणवीस राजीनामा का देत नाहीत?
बदलापूरच्या घटनेवरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे... मागच्या साडेसात वर्षापासून गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस काम करत आहे, तर सात वर्षात महिला अत्याचाराच्या घटना सर्वाधिक झाल्याचं सुषमा अंधारे यांनी म्हटलंय... खरंच सत्तेचा मोह नसेल आणि गृहमंत्री म्हणून वारंवार अपयशी ठरत असेल तर देवेंद्र फडणवीस राजीनामा का देत नाही? असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे... तसेच राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवार उडाला आहे... पोर्षे कारचे प्रकरण, वरळीतील वीरशहाचं आणि पनवेलची घटना असेल... मात्र देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री म्हणून सपशेल अपयशी ठरले आहे असा टोला त्यांनी लगावलाय... महाराष्ट्रातील आयांची विनंती आहे आपल्याला झेपत नाही तर राजीनामा द्या असं अंधारे म्हणाल्या.



















