Government Schools : कोरोना काळात सरकारी शाळांकडे विद्यार्थ्यांचा ओढा, विद्यार्थी संख्येत वाढ
कोरोना काळात विद्यार्थी आणि पालकांचा ओढा सरकारी शाळांकडे वाढल्याचं एका पाहणीत समोर आलंय. खासगी शाळांतून सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या गेल्या दोन वर्षांत साडेनऊ टक्क्यांनी वाढलीय. प्रथम फाऊंडेशन या संस्थेकडून दरवर्षी शालेय स्तरावरील शैक्षणिक स्थितीची देशपातळीवर पाहणी केली जाते. त्याआधारे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा, त्यांनी आत्मसात केलेल्या कौशल्यांचा लेखाजोखा मांडणारा ‘असर’ अहवाल प्रकाशित केला जातो. गेल्या काही वर्षांपासून गल्लोगल्ली उभ्या राहिलेल्या खासगी शाळांबाहेर प्रवेशासाठी पालकांची रांग आणि पटसंख्या घटली म्हणून शासकीय शाळा बंद कराव्या लागल्याचे चित्र दिसत होते. करोनाकाळात मात्र या परिस्थितीत बदल झाला असल्याचे ‘असर’च्या सर्वेक्षणातून दिसून आले आहे.



















