Solapur: आमदार Rajendra Raut यांच्या दोन्ही मुलांवर लग्न सोहळ्यात गर्दी जमवल्याप्रकरणी गुन्हा दाखल
बार्शीचे भाजप पुरस्कृत आमदार राजेंद्र राऊत यांच्या दोन्ही मुलांचा विवाह सोहळा रविवारी पार पडला. या लग्न सोहळ्यात कोरोनाविषयक सर्व नियमांचा अक्षरश: पायदळी तुडवण्यात आलं. अनेक सर्वपक्षीय नेत्यांसह हजारो लोक या विवाह सोहळ्यासाठी उपस्थित होते. मात्र गुन्हा दाखल झाला तो केवळ एका व्यक्तीविरोधात, ते देखील कर्मचाऱ्याविरोधात. त्यामुळे सर्वसामान्यांना वेगळा न्याय आणि नेत्यांना मात्र वेगळा न्याय अशी प्रशासनाची भूमिका आहे का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. त्यामुळे सर्वसामान्याविरोधात झालेली कारवाई मागे घेत दंड स्वरुपात त्यांच्याकडून वसूल करण्यात आलेले पैसे शासन परत करणार का असा सवाल देखील या निमित्ताने उपस्थित होतोय.





















