(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Solapur Lockdown : सोलापुरातल्या पाच तालुक्यात निर्बंध, 13 ऑगस्टपासून निर्बंध आणखी कडक होणार
एकीकडे पुणे, पिंपरी-चिंचवड वासियांना निर्बंधात शिथिलता देऊन प्रशासनानं दिलासा दिलाय. तर तिकडे सोलापूर जिल्ह्यातल्या पाच तालुक्यांमध्ये निर्बंध आणखी कडक करण्यात आलेत. पुणेकरांसाठी दिलाशाची बातमी म्हणजे सुट्टीचा एक दिवस वगळता पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील दुकानं सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. हॉटेल्स, रेस्टॉरंट्स सर्व दिवस रात्री १० पर्यंत सुरु राहणार आहेत... हॉटेल चालक आणि दुकानदारांना मात्र दोन्ही डोस घेणं बंधनकारक करण्यात आलंय...पुण्यातले मॉल्सही रात्री ८ पर्यंत सुरु राहणाऱ आहेत...लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांनाच मॉलमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.. पुणे ग्रामीणसाठी मात्र तिसऱ्या गटाचेच नियम लागू असणार आहेत.. तर तिकडे सोलापूर शहराचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट १ टक्का असूनही निर्बंध कायम ठेवण्यात आलेत. सोलापुरातील व्यापाऱ्यांनी मात्र प्रशासनाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केलीए. तर, १३ ऑगस्टपासून माढा, माळशिरस, करमाळा, सांगोला आणि पंढरपूर तालुक्यात कडक निर्बंध लावण्यात येणार आहेत..