Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 16 डिसेंबर 2021 : गुरूवार : एबीपी माझा
1. मुलींच्या लग्नाचं किमान वय अठरावरुन एकवीस करण्याचा केंद्र सरकारचा विचार, संसदेच्या याच हिवाळी अधिवेशनात विधेयक सादर होण्याची शक्यता2. बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालय कोणता कंदील दाखवणार? याकडे महाराष्ट्राचं लक्ष, काल सुनावणी टळल्यानं आज अंतिम निकालाची प्रतीक्षा 3. इम्पिरिकल डेटा मिळेपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्याची राज्य सरकारची मागणी, राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे लक्ष, उमेदवार आणि मतदारांच्या संभ्रमात भर4. विद्यापीठांच्या कुलगुरुंची नियुक्ती थेट राज्यपाल करू शकणार नाहीत, कायद्यातील बदलास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी, राज्यपाल विरुद्ध राज्य सरकारमधल्या वादाचा नवा अंक5. मराठमोळे लष्कर प्रमुख एम. एम. नरवणेंच्या खांद्यावर आणखी एक मोठी जबाबदारी, सीडीएस समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती6. बांगलादेश मुक्ती संग्रामाच्या विजयाचा सुवर्णमहोत्सव, एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट, थेट बांग्लादेशातून रिपोर्टिंग करणारं एकमेव मराठी न्यूज चॅनेल7. मुंबईत 35 टक्के डेल्टा तर 2 टक्के ओमायक्रॉन, जिनोम सिक्वेसिंगच्या चाचणीचे निष्कर्ष; महापालिकेकडून काळजी घेण्याचं आवाहन 8. पालघरमधल्या दुर्गम भागात लस पोहोचवण्यासाठी ड्रोन उडणार, प्रयोग यशस्वी झाल्यास अवयव प्रत्यारोपणासाठी ड्रोनचा वापर करणार9. अभिनेत्री आलिया भटकडून होम क्वॉरंटाईनच्या नियमांचं उल्लंघन, बीएमसीकडून 7 दिवसांचं क्वॉरंटाईन बंधनकारक, मात्र आलिया 5 दिवसानंतरच दिल्लीत 10. दौऱ्यापूर्वी शेरेबाजी योग्य नाही, माजी क्रिकेटपटू कपिल देव यांचा विराट कोहलीला सल्ला, बीसीसीआय आणि विराटमधल्या शीतयुद्धाची सर्वत्र चर्चा