(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sindudurga Vidhan Sabha 2024 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सज्ज, सीमेवर चौकशी
Sindudurga Vidhan Sabha 2024 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सज्ज, सीमेवर चौकशी
हे ही वाचा...
माजी आमदार राजन तेली उद्या ठाकरे शिवसेनेत प्रवेश करणार.
राजन तेली अनेक वर्षांनी पुन्हा एकदा स्वगृही परतणार.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हातात मशाल घेणार.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या माध्यमातून राजन तेली यांना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात उमेदवारी देण्यात येण्याची शक्यता.
मालवण राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटना प्रकरणी अजून एका आरोपीला उत्तर प्रदेश मिर्जापुर येथून अटक.
पुतळ्याच्या जोडणीचे काम करणाऱ्या परमेश्वर रामनरेश यादव मिर्जापुर, उत्तर प्रदेश मधून अटक.
गुन्ह्याच्या तपासामध्ये त्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने संशयित आरोपीला अटक.
आरोपीला मालवण दिवाणी न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी.
पुतळ्याच्या वेगवेगळ्या भागांची जोडणी करताना निकृष्ट दर्जाचे काम केल्याने गंज लागून पुतळा कोसळण्याची दुर्घटना घडल्याचे तांत्रिक तपासामध्ये निष्पन्न झाल्याने तिसऱ्या आरोपीला अटक.
आरोपी परमेश्वर यादव हा वेल्डर असून त्याने पुतळ्याच्या भागाचे नीट वेल्डिंग केले नसल्याचा त्याच्यावर ठपका आहे.